News

विदर्भाची कृषी पंढरी म्हणून ओळख असलेले डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात

Updated on 23 August, 2022 7:31 PM IST

विदर्भाची कृषी पंढरी म्हणून ओळख असलेले डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात २१ ऑगस्ट पासून समाज माध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसून येत आहे. संबंधित व्हिडिओमध्ये एक मुलगा काही मुलींसोबत तोंडाला स्कार्फ बांधून मुलींच्या हॉस्टेलमध्ये गेला आहे.हा प्रकार रक्षाबंधन या सणाच्या दिवशी झाला.विशेष म्हणजे सोबत असलेल्या मुलींनीच तो व्हिडिओ घेतला आहे. त्या

मुलाला हॉस्टेल मध्ये जात असताना कोणतीही आडकाठी आणली नाही ना कुणी विचारपूस ही केली नाही. व वसतिगृहात एका खोली मध्ये जाऊन त्याने फोटोशूट सुध्दा केला आहे.He has also done a photo shoot by going to a room in the hostel. बर आता हा मुलगा मुलींच्या वसतीगृहात जाऊन काय करत असेल? किती दिवसांपासून त्याच्या या वाऱ्या चालू असतील? हा प्रश्न सर्वांना पडला असुन विद्यापीठात शिकत असलेल्या मुलींच्या वडिलांच्या मनात भीतीचे

वातावरण निर्माण झाले आहे. सबंधित मुले या पदवीच्या द्वितीय वर्ष उद्यानविज्ञान या शाखेत शिकत असून हा प्रकार विद्यापीठातील वस्तीगृहांपैकी जिजाऊ वस्तीगृहात हा प्रकार घडलेला आहे.त्या सर्वांनी हे ठरवून केले आहे व त्यांना अस काही करायचं होत की आता पर्यंत हॉस्टेल ला अस काही झालं नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

पण कदाचित त्यांना हे माहीत नसावं की येणाऱ्या पिढीवर काय परिमाण होतील. संबंधित तरुण-तरुणींना कडक शिक्षा व्हावी जेणेकरून विद्यापीठात यानंतर काही वाईट प्रकरण घडून येणार नाही.सुरक्षा अधिकारी करतात तरी काय? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. या सबंधित प्रकरणाची कारवाई कशी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

 

प्रतिनिधी - गोपाल उगले

मो - 9503537577

English Summary: Dr. A shocking incident in the Jijau dormitory of the girls of Panjabrao Deshmukh Agricultural University.... Shocked to read!
Published on: 23 August 2022, 07:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)