शेतकरी वर्गाला नेहमीच वेगवेगळ्या संकटांचा सामना हा करावाच लागतो कधी अवकाळी पाऊस, तर कधी औषधफवारणी तर कधी भाव कमी तर कधी ऐन हंगामाच्या वेळी खतांचा तुटवडा या सारख्या समस्यांना शेतकरी वर्गाला सतत तोंड द्यावे लागत आहे. सध्या आर्थिक बाजारात अनेक मोठे बदल झाले आहेत महागाई वाढलेली आहे. यामागे अनेक अशी कारणे आहेत.शेतीमध्ये जोरदार पीक आणायचे असेल तर सर्वात महत्वाचे म्हणजे पाणी खत आणि माती. जर पिकांना खत दिले तर च पिके उसळून येतात . परंतु यंदा च्या वर्षी शेतकरी वर्गापुढे नवीन संकट उभे राहिले आहे. रशिया आणि युक्रेन च्या युद्धामुळे खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होऊन खतांच्या किमती मोठया प्रमाणात वाढणार असल्याचे समजते आहे.
तेलाच्या किमती मध्ये वाढ होत आहे :
युक्रेन आणि रशिया या दोन देशातील वाद वाढल्यामुळे युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. त्या युद्धाचा तणाव हा जागतिक बाजारपेठेनवर तसेच जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. या युद्धामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे शिवाय खाद्यतेल, पेट्रोल डिझेल गॅस यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्याच्याबरोबर च आता त्याचा परिणाम खतांवर सुद्धा होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.गेल्या काही दिवसांपासून तेलाच्या किमती मध्ये वाढ होत असल्यामुळे सोयाबीन ला उत्तम असा भाव मिळत होता आणि मिळत ही आहे परंतु युद्धामध्ये जागतिक तणाव निर्माण होऊन महागाई मोठया प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे या युद्धाचा परिणाम खतांच्या पुरवठ्यावर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे.
आयात आणि निर्यातीला जोरदार फटका:-
सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे जगभरातून आयात आणि निर्यातीवर याचा परिणाम झाला आहे. या युद्धामुळे जागतिक स्तरावर खतांचा बाजार अस्थिर झाला आहे. त्यामुळे खतांच्या किमती मोठया प्रमाणात वाढणार आहेत. आपला देश सुद्धा अनेक खते बाहेरून आयात करतो असे विधान निर्मला सीतारामन यांनी केली आहे त्यामुळे आगामी काळात शेतीवर मोठे संकट येणार असे सांगितले आहे.
खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होणार:-
रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश खतांची मोठ्या प्रमाणात आयात करतात. रशिया देशातील बेलारूस मधून सुद्धा जवळपास २० टक्के खतांची आयात होते. भारताने नुकतेच यासंदर्भात रशियासोबत दीर्घकाळणी करार केले आहेत. यातून २० लाख टन खतांची आयात दरवर्षी रशिया आपल्या भारत देशात करतो. परंतु यंदा च्या वर्षी रशिया आणि युक्रेन च्या युद्धामुळे जागतिक आयात आणि निर्यातीमध्ये मोठा परिणाम झाला आहे त्यामुळे यंदाच्या वर्षी आपल्या देशामध्ये खतांचा तुटवडा निर्माण होऊन खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे संकेत निर्मला सीतारामन यांनी दिले आहेत.
Published on: 05 March 2022, 06:17 IST