News

सध्या लग्न हा अतिशय महत्वाचा विषय झाला आहे. अनेकांची लग्न होत नाहीत यामुळे अनेक मुलं चिंतेत आहेत. असे असताना आता लग्न न झालेल्यांसाठी हरयाणा सरकारने मोठी घोषणा केली आहे.

Updated on 07 July, 2023 12:03 PM IST

सध्या लग्न हा अतिशय महत्वाचा विषय झाला आहे. अनेकांची लग्न होत नाहीत यामुळे अनेक मुलं चिंतेत आहेत. असे असताना आता लग्न न झालेल्यांसाठी हरयाणा सरकारने मोठी घोषणा केली आहे.

45 ते 60 वयोगटातील ज्या पुरुषांचे आणि महिलांचे लग्न झालेलं नाही त्यांना हरयाणा सरकारकडून 2,750 रुपयांची मासिक पेन्शन मिळणार आहे. यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे

ज्या अविवाहित पुरुष आणि महिलेचे वार्षिक उत्पन्न हे 1.80 लाखांच्या आत आहे त्यांना या पेन्शनचा लाभ मिळणार आहे. यामुळे याची चर्चा संपूर्ण भारतात आहे.

बांबूचे लाकूड का जाळत नाहीत? जाणून घ्या काय आहे सत्य..

हरियानामध्ये ही योजना लागू झाल्यानंतर राज्यातील सुमारे 1.25 लाख लोकांना याचा लाभ मिळणार आहे. यावेळी हरियाणामध्ये वृद्धापकाळ, विधवा निवृत्ती वेतन आणि अपंग निवृत्ती वेतनाची सुविधा दिली जाते.

भारतातील सर्वात महागडी म्हैस, किंमत 9 कोटी आणि वजन 1500 किलो

तसेच हरियाणा सरकारने वृद्धापकाळ निवृत्ती वेतन 3000 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. 

राज्य बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार पुन्हा अडचणीत, जरंडेश्वर कारखान्याबाबत मोठी बातमी आली समोर..
हार्वेस्टर मशीनवर ५०% सबसिडी मिळणार, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

English Summary: Don't stress if you don't get married! Now the government is giving a monthly pension of Rs 2750 to unmarried children, know...
Published on: 07 July 2023, 12:03 IST