News

स्टार्टअपची कल्पना जोरात सुरू आहे, अनेक स्टार्टअप यशस्वी झाले आहेत आणि अनेकांना त्यांचे स्टार्टअप बंद करावे लागले आहेत. आरपीजी एंटरप्रायझेसचे प्रमुख हर्ष गोयंका यांनी ट्विट करत "स्टार्टअप यशस्वी होण्यासाठी काही टिपा दिल्या आहेत." हर्ष गोयंका यांनी दिलेला यशाचा गुरुमंत्र आपण जाणून घेणार आहोत.

Updated on 17 May, 2022 12:39 PM IST

स्टार्टअपची कल्पना जोरात सुरू आहे, अनेक स्टार्टअप यशस्वी झाले आहेत आणि अनेकांना त्यांचे स्टार्टअप बंद करावे लागले आहेत. आरपीजी एंटरप्रायझेसचे प्रमुख हर्ष गोयंका यांनी ट्विट करत "स्टार्टअप यशस्वी होण्यासाठी काही टिपा दिल्या आहेत." हर्ष गोयंका यांनी दिलेला यशाचा गुरुमंत्र आपण जाणून घेणार आहोत.

स्टार्टअप सुरू करण्यापूर्वी तुमची कल्पना नाविन्यपूर्ण असणे आवश्यक आहे. अनेक कंपन्या केवळ निधी मिळवण्यासाठी त्यांचे मूल्यांकन वाढवतात त्यामुळे कंपनी मूळ उद्देशापासून दूर जाते. आरपीजी एंटरप्रायझेसचे प्रमुख हर्ष गोयनका यांनी याबाबत ट्विट करून यशाच्या टिप्स दिल्या आहेत.

आरपीजी एंटरप्रायझेसचे हर्ष गोएंका यांचा अनुभव तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. गोएंका यांनी ट्विटमध्ये एक ग्राफ्स शेअर केला आहे. टॉप 10 स्टार्टअप मिस्टेक असे लिहून त्यांनी हा आलेख समायोजित केला आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे की, मार्केटचा नीट अभ्यास करा, लोकांना न आवडणारे उत्पादन घेऊन मार्केटमध्ये उतरणे आत्मघातकी ठरेल. चुकीच्या लोकांची निवड आणि नियुक्ती, ग्राहकांऐवजी गुंतवणूकदारांच्या मागे धावणे, मुख्य कंपनी प्रवर्तकांच्या हातात वाजवी रक्कम नसणे.

आपल्या गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करणे, मदत मागायला लाज वाटणे आणि सोशल मीडियाकडे दुर्लक्ष करणे ही सर्वात मोठी चूक आहे जी उद्योजकाला मागे खेचते. त्यामुळे या चुका टाळण्याचा सल्ला गोयंका देतात. जर तुम्ही या चुका केल्या नाहीत तर तुमचा वेळ आणि पैसा वाचेल आणि योग्य दिशेने वाटचाल होईल.

महत्वाच्या बातम्या
टाकळीभान उपबाजारातील प्रकार! कांद्याला मिळाला प्रतिकिलो 1 रुपये भाव; शेतकऱ्याचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
बंधुंनो सावधान! जर तुम्ही कुणाला तुमच्या आधार आणि पॅन कार्डची प्रत देत असाल तर निघू शकते तुमच्या नावाने परस्पर लोन

English Summary: Don't make these 10 mistakes when starting a startup, Harsh Goenka's Guru Mantra..
Published on: 17 May 2022, 12:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)