सध्या नाशिकच्या शेतकऱ्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. याचे कारण म्हणजे नाशिक जिल्हा बँकेकडून कर्जामुळे शेतकऱ्यांवर कारवाई केली जात आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आर आणि पारची लढाई घेऊन आता रस्त्यावर उतरले आहेत.
यावेळी राजू शेट्टी देखील उपस्थित होते. ते म्हणाले, प्रश्न सोडवण्याचा निर्धार करून रस्त्यावर आलो आहे. त्यामुळे प्रश्न सुटल्याशिवाय शांत राहणार नाही.
राजू शेट्टी यांनी बिऱ्हाड आंदोलन काढून बँकेला थेट इशारा दिला आहे. जिल्हा बँकेवर अक्षरशः दरोडा घालणारे नामानिराळे आहेत. तर कारवाई होऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांशी जुळवूनही घेतले जाते.
एकदा लावले की ४० वर्ष पैसाच पैसा!! बांबू शेती ठरतेय फायदेशीर..
धनदांडग्यांना कर्ज भरण्यासाठी विनंती करायची आणि शेतकऱ्यांवर मात्र कारवाई करायची ही पद्धत येथील बँकांची असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. यामुळे आता वातावरण चांगलेच तापले आहे.
तसेच ते म्हणाले, लिलाव झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही. सरकारने दिलेले शब्द पाळले नाही, तर शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या दारात सर्व शेतकरी धडकणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
Red Ladyfinger: शेतकऱ्यांनो एकदा लाल भेंडी लावाच, मोठ्या मागणीमुळे मिळतोय जास्तीचा भाव..
दरम्यान, जिल्हा बँकेची सक्तीची कर्जवसुलीही होणार नाही. एकरकमी तडजोडीसंदर्भात निर्णय होईपर्यंत कर्जवसुलीसाठी तगादा लावला जाणार नसल्याचे अश्वासन सहकार मंत्री दादा भूसे यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या;
ममता जैन यांची कृषी जागरण समूहाच्या संपादक नियुक्ती...
विनाश पृथ्वीचा नाही, जीवसंस्कृतीचा होऊ शकतो
देशातील इथेनॉल क्षमता 25 टक्यांनी वाढणार, शेतकऱ्यांना होणार फायदा..
Published on: 17 January 2023, 10:19 IST