News

उत्पन्न चांगले आले की आपल्या शेतमाला योग्य भाव मिळेल असं आपल्याला वाटत असते. परंतु बऱ्याचवेळात आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. सध्या तर लॉकडाऊन चालू आहे. यामुळे शेतमाल बाजारात येऊ शकत नाही.

Updated on 16 May, 2020 1:56 PM IST


उत्पन्न चांगले आले की आपल्या शेतमाला योग्य भाव मिळेल असं आपल्याला वाटत असते. परंतु बऱ्याचवेळात आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. सध्या तर लॉकडाऊन चालू आहे. यामुळे शेतमाल बाजारात येऊ शकत नाही. वाहतुकीची सोय नसल्याने माल शेतात पडून आहे. तर बाजारात आलेल्या मालाला ग्राहक नसल्याने योग्य दर मिळत नाही. या समस्य़ेची दखल घेत सरकार आणि आरबीआय शेतकऱ्यांच्या मदतीला धावले आहेत.

जर आपल्या माला योग्य दर मिळत नसल्यास -
शेतकरी बांधवानो आपल्या शेतमालाला योग्य दर मिळत नाही तर आपण ही गोष्टी केली तर आपल्याला फायदा होईल. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यास तुम्ही आपला शेतमाल शीतगृहात कोल्ड स्टोरेज मध्ये काही महिन्यासाठी ठेवा. कोल्ड स्टोरेजमधून मिळालेल्या पावतीवरून आपण बँकेतून पैसे मिळवू शकता, तेही रोख पैसे. त्यादरम्यान तुम्ही कोणी खरेदी करणारा शोधू शकता,. जो आपल्या योग्य दर देईल.

इतका लागेल व्याज - आपण जो शेतमाल शीतगृहात ठेवाल तर त्यावर बँकेतून घेण्यात आलेल्या पैशावर ७ टक्के व्याज लागेल. आरबीआयच्या वेबसाईटनुसार (भारतीय रिझर्व्ह बँक) पीक कापणीनंतर सहा महिन्यापर्यंत ही सुविधा पुरवली जाणार आहे. जर तुम्ही छोटे व्यापारी आहात किंवा कसवरती शेती करत आहात तर आपल्याला किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत कमी व्याज दयावा लागेल. भारत सरकारने किसान क्रेडिट कार्डची स्कीम १९९८ मध्ये सुरू केली होती. या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत असतो. शेतीसाठी लागणारी अवजारे, खते या कार्डच्या आधारे घेता येतात. प्रत्येक हंगामासाठी ३ लाख रुपयांचे कर्ज या कार्डाच्या माध्यमातून आपण घेऊ शकतात. वेळेवर व्याज भरले तर आपल्याला अधिकचा फायदा होत असतो. सध्या आरबीआयने एक बँकांना याविषयीच्या सुचना दिल्या आहेत. केसीसीच्या योजनांवरील कर्जाच्या व्याजावर दोन टक्क्याची देण्याचे निर्देश दिलेत.

English Summary: does yours crops get good price? use this tricks get awesome price
Published on: 16 May 2020, 01:40 IST