जर तुम्ही एलपीजी गॅसचा वापर करता तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. आपल्याला माहिती आहे, की एलपीजी गॅस घेतल्यावर सरकार सबसिडी देते आणि ही दिली जाणारी सबसिडी सरकार ग्राहकांच्या खात्यामध्ये पाठवते.
परंतु पाठवले गेले हे पैसे आपल्या अकाउंट मध्ये येत आहेत की नाही, हे माहीत करून घेणे फार महत्त्वाचे असते एलपीजी गॅस सबसिडी ही वेगळ्या राज्यांमध्ये ही वेगवेगळ्या प्रमाणात निर्धारित करण्यात आली आहे ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपये आहे अशा ग्राहकांना सरकारने सबसिडी देणे बंद केले आहे. त्यामध्ये पती-पत्नी अशा दोघांच्या उत्पन्नाचा समावेश आहे. तुम्हाला एलपीजी वरच्या अनुदान मिळते की नाही हे चेक करायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता.
गॅस सबसिडीचा पैसा अकाउंट मध्ये येत आहे की नाही ते खालील प्रमाणे तपासावे.
-
सगळ्यात अगोदर तुम्हाला इण्डेण गॅसच्या अधिकृत वेबसाईट https://bit.ly/3rU6Lol वर भेट द्यावी.
-
त्यानंतर तुमच्यासमोर सिलेंडरचे एक इमेज दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर कंप्लेंट बॉक्स ओपन होईल. यामध्ये सबसिडी स्टेटस लिहून प्रोसीड बटन दाबावे.
-
त्यानंतर सबसिडी रिलेटेड बटन वर क्लिक करून त्यानंतर सन कॅटेगरी मध्ये काही नवीन ऑप्शन येतील तेथे तुम्हाला सबसिडी नोट रिसिवेड वर क्लिक करावे लागेल.
-
त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर नोंद करावा लागेल जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर 1 आयडी चा ऑप्शन असेल त्यामध्ये तुमचा गॅस कनेक्शन आयडी इंटर करावा. त्यानंतर व्हेरिफाय होऊन तुम्हाला सबमिट करावे लागेल.
-
त्यानंतर सबसिडी विषयी संबंधित माहिती तुमच्या समोर येते. किती सबसिडी तुम्हाला मिळाली आहे व किती पाठवली जाणार आहे हे सगळे तुम्हाला समजते.
-
तुम्ही 18002333555 या टोल फ्री नंबर वर कॉल करून तुमची तक्रार दाखल करू शकतात.
Published on: 23 February 2021, 02:21 IST