आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचे आणि कुठल्याही कामात लागणारे महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्डवर जे आपल्या अगोदरचे फोटो आहेत हे जरा व्यवस्थित दिसत नाहीत. जर तो मला तुमच्या आधार कार्ड वरचा फोटो बदल करायचा असेल तर तुम्ही काही सोप्या पद्धती वापरून तो बदलू शकता. याबाबतची माहिती या लेखात करुन घेणार आहोत.
आधार कार्ड बद्दल आपल्याला माहिती आहे की, आधार कार्ड वरील नाव, तुमचा पत्ता, मोबाईल नंबर, फोटो इत्यादी माहिती असते. युआयडीएआय आगोदर आधार कार्ड वर लिही माहिती बदलण्यासाठी ऑनलाइन सुविधा देत होती. मात्र आता ही ऑनलाइन सुविधा फक्त पत्ता बदलण्यासाठी देण्यात येते. जर तुम्हाला आधार कार्ड वरील ई-मेल, फोटो, जन्मतारीख इत्यादी बदल लावायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार कार्ड केंद्रात किंवा पोस्टाद्वारे ऑफलाईन अर्ज करावा लागतो. जर तुम्हाला आधार कार्ड वर फोटो बदलायचा असेल तर काही सोप्या पद्धती खालीलप्रमाणे आहेत.
फोटो बदलवण्यासाठीच्या काही महत्त्वाच्या पायऱ्या
-
सगळ्यात अगोदर तुम्हाला युआयडीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तिथे गेट आधार सेक्शन वर अपडेट चा फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
-
तो फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर तो पूर्ण भरून तो तुमच्या जवळच्या आधार सेंटर मध्ये जाऊन जमा करावा. तिथे तुमच्या बायोमेट्रिक म्हणजे बोटाचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन आणि चेहरा पुन्हा एकदा कॅप्चर केला जाईल.
-
तुमचे फोटो अपडेट रिक्वेस्ट एक्सेप्ट झाल्यानंतर तुम्हाला लगेच यु आर एन किंवा अपडेट रिक्वेस्ट मोबाईल वर येईल.
-
या नंबर चा आधार वर तुमचा नवीन फोटो अपडेट होईल.त्यानंतर पुढच्या 90 दिवसांच्या आत तुम्हाला तुमचे आधार कार्ड नव्या फोटो सह मिळेल.
Published on: 22 March 2021, 07:51 IST