तुम्हाला गृह विमा पॉलिसीविषयी माहिती आहे का ?

29 April 2021 09:20 PM By: KJ Maharashtra

तेव्हा अशा प्रसंगी एखादी छानशी गृह विमा पॉलिसी असणे फायदेशीर असते. तेव्हा आपण या लेखामध्ये गृह विमा पॉलिसी बद्दल माहिती घेऊ.

 गृह विमा पॉलिसी नेमकी काय आहे?

 आपल्या घराला मुसळधार पाऊस, महापूर, भूकंप इत्यादी नैसर्गिक आपत्ती तसेच एखादा जातीय हिंसाचार, दंगल, जाळपोळ,  इत्यादी मानवनिर्मित संकटांमुळे संरक्षण मिळावे त्यासाठी गृह विमा पॉलिसी असते.

गृह विमा पॉलिसीत समाविष्ट घटक

  • घर भाडे- जर आपल्या घराचे नुकसान झाले आणि तेथे राहण्यायोग्य राहिले नसेल तर संबंधित घराची पुनर्बांधणी होईपर्यंत किंवा त्याची पूर्ण डागडुजी होईपर्यंत घर मालकाला राजासाठी एखाद्या पर्यायी निवासाची व्यवस्था करावी लागते. त्यामुळे पर्यायी व्यवस्था साठी लागणारे भाडे किंवा जर ते घर भाडेकरूंना भाड्याने देऊन उत्पन्न सुरू असेल तर त्या उत्पन्नाची देखील या पॉलिसीत तरतूद आहे.

  • घरातील साहित्य- या पॉलिसीमध्ये घरातील साहित्य,  फर्निचर, मौल्यवान वस्तू,  टीव्ही, फ्रिज,  वाशिंग मशीन, एयर कंडीशनर,  लॅपटॉप,कपडे, इतर वस्तू जसे प्लेट, ग्लास इत्यादी गोष्टींना देखील या पॉलिसी द्वारे संरक्षण मिळते.

  • बांधकाम खर्च- घराचे किंवा संबंधित फ्लॅटचे जर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित  घटकां मुळे नुकसान झाले तर असल्या ओढावं नाऱ्या संकटापासून संरक्षण मिळण्यासाठी गृह विमा असतो.

 

  • अपघात विमा आणि थर्ड पार्टी लायबिलिटी- घरातील सदस्य, घर काम करणारे नोकर यांच्याबरोबरच घरातील इतर काही कारणामुळे  तिऱ्हाईत व्यक्तीस अपघात झाल्यास त्यासाठी देखील या विमा पॉलिसी तरतूद आहे.

  • लॉकर  मधील दागिने- आग, भूकंप,  महापूर, घरफोडी आदी कारणांमुळे बँकेतील लॉकर मध्ये ठेवलेल्या दागिने आणि घरातील दागिन्यांच्या नुकसान झाल्यास या पॉलिसी अंतर्गत विमा संरक्षण मिळते.

 

home insurance policy गृह विमा पॉलिसी
English Summary: Do you know about a home insurance policy?

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.