News

शेतकरी मित्रांनो जर आपण मोदी सरकारच्या पीएम किसान सम्मान निधि योजनेसाठी पात्र असाल तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी. पीएम किसान सम्मान निधि योजना ही भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र जी मोदी यांच्या एक महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक आहे. सदर योजनामोदी सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अमलात आणली आहे, या योजनेअंतर्गत पात्र शेतकर्‍यांना वार्षिक सहा हजार रुपये प्रदान केले जातात, योजनेअंतर्गत 2000 रुपयाचा तीन महिन्यात एक हफ्ता असे तीन हप्ते पात्र शेतकर्‍यांना त्यांच्या बँक खात्यात वितरित केले जातात. आतापर्यंत मोदी सरकार या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दहा हफ्ता वितरित करून चुकली आहे.

Updated on 21 January, 2022 10:40 PM IST

ही योजना विशेषता अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे, योजनेसाठी दोन हेक्‍टरपेक्षा कमी क्षेत्र असलेले सातबारा धारक शेतकरी पात्र असतात. मात्र या योजनेत अनेक घोटाळेबाज व्यक्तींनी चुकीच्या मार्गाचा अवलंब करून लाभ उचलला आहे, त्यामुळे या योजनेत होत असलेला गैरव्यवहार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना रेशन कार्ड अनिवार्य केले आहे. म्हणजेच रेशन कार्ड नंबर प्रदान केल्यानंतरच या योजनेचा पुढचा हप्ता पात्र शेतकर्‍यांना मिळू शकणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांनी योजनेसाठी रजिस्ट्रेशन करताना काही मिस्टेक झाली असेल तर त्याची सुधारणा करणे आवश्यक आहे, जेणेकरून योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी भविष्यात कुठलीच अडचण भासणार नाही. आम्ही आज रजिस्ट्रेशन करताना काही चूक झाली असेल तर तिची दुरुस्ती कशी करायची याविषयी आपणास बहुमूल्य माहिती देणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या महत्वपूर्ण माहिती विषयी.

अशी करा दुरुस्ती

»जर योजनेसाठी अर्ज करताना काही मिस्टेक झाली असेल तर ती आपण घर बसल्या दुरुस्त करू शकता यासाठी आपणास पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या https://pmkisan.gov.in/ या ऑफिशिअल वेबसाईट वर भेट द्यावी लागेल.

»वेबसाईट वर गेल्यानंतर वेबसाईटच्या मुख्यपृष्ठ वरती आपणास फार्मर्स कॉर्नर Farmers Corner या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

तेथे गेल्यानंतर आधार एडिट या पर्यायावरती जावे लागेल. इथे आपणास आपला बारा अंकी आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करावा लागेल तसेच खाली दिलेल्या कॅपच्या कोड देखील प्रविष्ट करावा लागेल, एवढे केल्यानंतर आपणास सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.

»त्यानंतर आपणासमोर एक फॉर्म ओपन होईल, यामध्ये सर आपल्या नावात काही चूक असेल तर ते आपण दुरुस्त करू शकता.

»तसेच फॉर्म मध्ये अन्य प्रकारच्या काही त्रुटी असतील तर त्या आपण येथूनच दुरुस्त करू शकता तसेच यासंबंधी अधिक माहितीसाठी आपण आपल्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क देखील साधू शकता.

English Summary: Do this work immediately to get the next installment of PM Kisan Yojana
Published on: 21 January 2022, 10:40 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)