मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेत पैकी एक पी एम किसान सन्मान योजनेचे आतापर्यंत देशातील सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचे प्रत्येकी दहा हप्ते देण्यात आले आहेत. दहावा हफ्ता नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे एक जानेवारीला यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र जी मोदी यांच्या करकमलाद्वारे पीएम किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना देऊ करण्यात आला. पीएम किसान सम्मान निधि योजनेचा अकरावा हप्ता आता एप्रिल मध्ये येणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र असे असले तरी, पीएम किसान चा अकरावा हप्ता अशाच पात्र शेतकऱ्यांना दिला जाणार आहे ज्या पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली असेल.
पीएम किसान सम्मान निधि योजना केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेसाठी देशातील सुमारे अकरा कोटी शेतकरी पात्र आहेत, आपल्या महाराष्ट्रातील देखील एक कोटी पाच लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. या योजनेद्वारे पात्र शेतकर्यांना वार्षिक 6000 रुपये, 2000 रुपयेप्रमाणे एकूण तीन हप्त्यांत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. आतापर्यंत योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना 10 हफ्ते केंद्राने सुपूर्द केले आहेत. एप्रिलमध्ये या योजनेचा अकरावा हप्ता केंद्राद्वारे लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. मात्र असे असले तरी, आता या योजनेचे लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. एप्रिल मधील अकरावा हप्ता मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत ई-केवायसी करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. मात्र या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांनी जर 31 मार्च पर्यंत ई-केवायसी केली नाही, तर अशा शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित देखील राहावे लागू शकते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यावी.
कशी करणार ई-केवायसी
शेतकरी बांधवांनो जर आपण अद्याप पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी पूर्ण केली नसेल, तर आपण घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने किसान ॲप द्वारे केवायसी करू शकता. अथवा आपण आपल्या नजीकच्या आपले सेवा केंद्रावर भेट देऊन ई-केवायसी करू शकता. केवायसी करण्यासाठी मोबाईल नंबर तसेच आपले बँक अकाउंट आधारशी लिंक असणे अनिवार्य असते.
ई-केवायसी करूनही हप्ता न मिळाल्यास करा या ठिकाणी तक्रार
शेतकरी मित्रांनो केवायसी करून देखील जर आपणास एप्रिल महिन्यात पी एम किसान चा अकरावा हप्ता प्राप्त झाला नाही तर आपण पीएम किसानच्या 18001155266 या नंबर वर संपर्क साधून तक्रार नोंदवू शकता. किंवा आपण पीएम किसानच्या 155261 या हेल्पलाइन नंबर वर देखील तक्रार नोंदवू शकता. अथवा आपण पीएम किसानच्या 011-23381092, 23382401 या लँडलाइन क्रमांकवर देखील संपर्क करू शकता. तसेच आपण पीएम किसानच्या 0120-6025109 या नवीन हेल्पलाइन नंबर वर देखील आपली तक्रार नोंदवू शकता. किंवा आपण पी एम किसानच्या pmkisan-ict@gov.in या ई-मेल आईडीवर तक्रार नोंदवू शकता.
Published on: 25 January 2022, 10:10 IST