News

दिवाळी पूर्वी धान खरेदी केंद्र सुरू होईल असं आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आले होते. पण दिवाळी झाली तरी भंडाऱ्यात धान खरेदी केंद्र सुरु झाले नाही. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी आता असंतोष व्यक्त करत आहेत.

Updated on 16 November, 2023 1:50 PM IST

Bhandara News : दिवाळी पूर्वी धान खरेदी केंद्र सुरू होईल असं आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आले होते. पण दिवाळी झाली तरी भंडाऱ्यात धान खरेदी केंद्र सुरु झाले नाही. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी आता असंतोष व्यक्त करत आहेत.

राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांना धान केंद्र सुरु होण्यास विश्वास होता. मात्र दिवाळी संपलेली आहे तरीसुद्धा जिल्ह्यातील एकही धान खरेदी केंद्र अद्याप तरी सुरू झालेला नाही. यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांना धान खासगी व्यापाऱ्यांना द्यावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांन दर देखील कमी मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेलेली असून त्यांच्या राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष पाहायला मिळत आहे.

धानाचा उत्पादन खर्च जास्त आहे परिणामी आता त्यातून उत्पन्न देखील चांगले येत नाही. यामुळे सरकारने आता खरेदी केंद्र सुरु करावे आणि बोनस द्यावा, अशी मागणी या भागातील धान उत्पादक शेतकरी करत आहेत. तसंच दिवाळी पण निघून गेली आहे. अजून पर्यंत केंद्र सुरू झाली नाहीत. लोकांच्या भरपूर समस्या आहेत. त्यामुळे लवकर केंद्र सुरू करण्यात यावी आणि लवकर बोनस दिला जावा, अशी प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने दिली.

दरम्यान, सहकारी संस्थेत भरपूर अडचणी आहेत. तांत्रिक प्रॉब्लेम आहेत, कधी साईट चालू राहत नाही, यामुळे शेतकऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

English Summary: Diwali of farmers in darkness; Despite the government's promise, the paddy procurement center is not open
Published on: 16 November 2023, 01:50 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)