News

शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणाऱ्या जिल्हा बँकांबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आता जिल्हा बँका लवकरच राज्य बँकेत ( State Bank ) विलीन होण्याची शक्यता आहे.गेल्या दहा वर्षांमध्ये अनेकदा जिल्हा बँका या राज्य बँकेत विलीन कराव्यात याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

Updated on 22 August, 2022 11:34 AM IST

शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणाऱ्या जिल्हा बँकांबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आता जिल्हा बँका लवकरच राज्य बँकेत ( State Bank ) विलीन होण्याची शक्यता आहे.गेल्या दहा वर्षांमध्ये अनेकदा जिल्हा बँका या राज्य बँकेत विलीन कराव्यात याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

याबाबत केंद्रातील सहकार खात्याकडून याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे. विलिनीकरणाच्या पार्श्वभूमीवर सध्या केंद्रातील सहकार विभागाकडून अहवाल (Report) तयार करण्याचे काम सुरू आहे. यामुळे हा निर्णय झाला तर याचा शेतकऱ्यांना फायदा होणार की तोटा होणार हे देखील लवकरच समजेल. येणाऱ्या तीन महिन्यात केंद्रातील सहकार विभागाकडून जिल्हा बँकांच्या विलिनिकरणाबाबत अहवाल तयार करण्यात येणार आहे.

यावर या अहवालानंतर जिल्हा बँका या राज्य बँकांमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे. या विलिनिकरणाचे महत्वाचे कारण म्हणजे सध्या राज्यातील अनेक जिल्हा बँका या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. आता सहकार विभागाच्या या अहवालावरच जिल्हा बँकांचे भवितव्य ठरणार आहे. मागील प्रस्तावाला राज्यातील अनेक सहकार क्षेत्रातील संस्था तसेच नेत्यांनी विरोध केला आहे.

हा चिखल पायाला काय, अख्ख्या अंगाला लागला तरी झटकला जात नाही कारण..

राज्यात असणाऱ्या जिल्हा सहकारी बँकांची स्थिती चांगली नाही. प्रमुख 31 बँकांपैकी निम्म्याहून अधिक बँका या तोट्यात आहेत. यामुळे येणाऱ्या काळात त्या बंद पडण्याची देखील शक्यता आहे. याबाबत केंद्रातील सहकार विभागाकडून अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. पुढील तीन महिन्यात हा अहवाल सादर होणार आहे.

2024 मध्ये विरोधी पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? अखिलेश यादव यांनी सांगितले महाराष्ट्रातील 'या' नेत्याचे नाव..

या अहवालानंतर बँकेंचे विलिनीकरण होणा की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे आता याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. या बँकांवर अनेक नेत्यांचे वर्चस्व आहे. यामुळे हा निर्णय झाला तर पुढे त्या कशा चालवल्या जाणार त्यावर कोणाची आणि कशी नेमणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
टोळ्यांनी फसवलं!! ऊसतोड कामगारांकडून तब्बल 39 कोटी रुपयांची फसवणूक, धक्कादायक आकडेवारी आली समोर
दिवस घरापासून दूर, 108 किलो वजन केले कमी, सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या मुलाने केलं तरी काय..
चोरट्यांचे आगळंवेगळं धाडस! शेतकऱ्यांनो आता मोटर नाही तर चालू विद्युत डीपी'च गेलीय चोरीला..

English Summary: district banks, economic backbone farmers, merge state banks? Modi government
Published on: 22 August 2022, 11:34 IST