News

शेतकऱ्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जिल्हा बॅंकने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी मार्च अखेर नियमित एप्रिलमध्ये कर्जफेड वाढीव करून कर्जाचा लाभ घ्यावा.

Updated on 30 March, 2022 3:50 PM IST

शेतकऱ्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकने (Ahmednagar District Co-operative Bank) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, तसेच त्यांची सावकारी जाचातून मुक्तता व्हावी या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.

माजी मंत्री व अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकचे संचालक शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत पीक कर्जाची मर्यादा एकरी २० हजार ऐवजी ३० हजार करावी, अशी मागणी केली होती.

या मागणीला संचालक मंडळाने एकमुखी पाठिंबा दिला व बँकेचे अध्यक्ष उदय शेळके (Uday Shelke) व उपाध्यक्ष माधवराव कानवडे (Vice President Madhavrao Kanwade) यांनी या प्रस्तावास मान्यता दिली. आता मार्च अखेर ज्या सभासदांनी आपले पीक कर्ज पूर्ण भरले असेल अशा सभासदांना १५ एप्रिलपर्यंत ही कर्जसुविधा उपलब्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
ऊसाचा राडा काय संपेना; हंगामाच्या अंतिम टप्प्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न पेटणार
काय सांगता..! 'या' गावातील पाणी अचानक झाले गायब; जमिनीला पडल्या भेगा

तसेच कोरोना काळात संजीवनी ठरलेल्या खेळते भांडवल योजनेचे कर्जही नियमित भरणारांना परत मिळणार आहे. ही दोन्ही कर्ज अल्प व्याजदराने मिळणार असल्याने ऐन अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जिल्हा बॅंकने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी मार्च अखेर नियमित एप्रिलमध्ये कर्जफेड वाढीव करून कर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक कर्डिले यांनी केले आहे.

English Summary: District Bank raises loan limit
Published on: 30 March 2022, 03:50 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)