नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शिर्डी येथील काकडी येथे कार्यक्रमादरम्यान वितरण करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत.त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीत 7,500 कोटींच्या कामांचं लोकार्पण करण्यात आल आहे. तसेच निळवंडे धरणाच्या कालव्याचा लोकार्पण करण्यात आले. त्याच बरोबर शिर्डी संस्थानच्या नव्या इमारतीचे आणि शिर्डीतील दर्शन रांग संकुलाचे पंतप्रधान मोदींनी उध्दघाटन केले.
सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साई बाबाचे दर्शन घेतले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे धरणाच्या कालव्याचा लोकार्पण करण्यात आले.निळवंडे धरणाच्या पाण्यामुळे 182 गावांतील जमिनी ओलीता खाली जाणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित होते. शिर्डी येथील काकडी येथे कार्यक्रमादरम्यान मंत्री विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना संबोधीत केलं आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले .
राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटी रुपयांचा निधी वितरणास मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमा वेळी जैविक शेती संबंधीत नृत्य कलाकार वर्गाकडून सादर करण्यात आले.नमो शेतकरी महासन्मान निधी सोहळ्याला नागरीकांची मोठी गर्दी जमली होती. या कार्यक्रमानिमित्त शिर्डीत चोख पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता.
Published on: 26 October 2023, 04:24 IST