कृषी संजीवनी सप्ताहात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत दिनांक २५ जून ते १ जुलै २०२२ पर्यंत शेतकरयांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन व प्रात्यक्षिकातून माहिती देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मृद विज्ञान व कृषी रसायन शास्त्र विभागातील अखिल भारतीय समन्वयीत सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये प्रकल्प अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील असलेल्या सुमिता या गावात आदिवासी शेतकरी बांधवांना खताच्या संतुलित मात्रेचा उपयोग करण्याकरता मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले.अंतरराष्ट्रीय मृदा विज्ञान महासंघ या वर्षी जागतिक मृदा दिवसाच्या निमित्ताने रासायनिक खताचा संतुलित व कार्यक्षम वापर म्हंणून साजरे करत आहे.
दिनांक 25 जून 2022 रोजी धारणी तालुक्यातील असलेल्या सुमिता गावातिल आदिवासी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जाऊन संतुलित खताचा वापर व कार्यक्षमता याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. सूक्ष्म व दुय्यम प्रकल्प अंतर्गत सुमिता येथील निवडक आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर प्रथम रेषीय प्रात्यक्षिक आधारे सोयाबीन पिकाकरिता गंधक या खताचे वाटप करण्यात आले होते. कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या संकल्पनेतून तसेच संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनातून व विभाग प्रमुख
डॉ. संजय भोयर यांच्या पुढाकाराने सदर प्रथम रेषीय प्रात्यक्षिक आदिवासी शेतकऱ्यांच्या बांधावर देण्यात आले होते. आदिवासी शेतकरी बांधवाना गंधक या खत वाटप करून मातीचे नमुने यापूर्वीच गोळा करण्यात आले होते. सदर मृदेच्या नमुनेचे पृथक्करण करून त्यामधून मुख्य व दुय्यम, सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण मृदा आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना समजावून सांगण्यात आले व संतुलित खताचा कार्यक्षम व वापर याबाबत सुद्धा त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करता प्रकल्प प्रमुख डॉ.संदीप हाडोळे, कनिष्ठ मृदा शास्त्रज्ञ श्री. प्रशांत सरप,संशोधन संयोगी डॉ. अक्षय इंगोले, कृषी सहायक श्रेयस नांदुरकर तसेच कुशल मदतनीस अमोल पाटील यांनी सहभाग नोंदवला.
त्याचाच एक भाग म्हणून मृद विज्ञान व कृषी रसायन शास्त्र विभागातील अखिल भारतीय समन्वयीत सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये प्रकल्प अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील असलेल्या सुमिता या गावात आदिवासी शेतकरी बांधवांना खताच्या संतुलित मात्रेचा उपयोग करण्याकरता मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले.अंतरराष्ट्रीय मृदा विज्ञान महासंघ या वर्षी जागतिक मृदा दिवसाच्या निमित्ताने रासायनिक खताचा संतुलित व कार्यक्षम वापर म्हंणून साजरे करत आहे.
Published on: 01 July 2022, 05:31 IST