News

मुंबई: राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दुधाळ संकरित गायी, म्हशींच्या गट वाटप योजनेमध्ये देशी गायींच्या वाटपाचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे.

Updated on 24 January, 2019 11:01 AM IST


मुंबई:
राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दुधाळ संकरित गायी, म्हशींच्या गट वाटप योजनेमध्ये देशी गायींच्या वाटपाचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपयोजनेंतर्गत दुधाळ पशुंच्या गट वाटपाची योजना राबविण्यात येते. 2015 पासून याबाबतच्या जुन्या योजनांऐवजी सहा, चार किंवा दोन दुधाळ गाई किंवा म्हशींचे गट वाटप करण्याची नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येते.

देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी आता या योजनेत देशी गायींच्या गट वाटपाचा समावेश करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. गीर, सहिवाल, रेड सिंधी, राठीथारपारकर, देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी गायी या योजनेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. प्रतिदिन 10 ते 12 लिटर दूध उत्पादन क्षमतेच्या एचएफ,जर्सी गायी, प्रतिदिन 8 ते 10 लि. दूध उत्पादन क्षमतेच्या गीर, सहिवाल, रेड सिंधीराठी, थारपारकर या देशी गायी आणि प्रतिदिन 5 ते 7 लि. दुग्धोत्पादन क्षमतेच्या देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी या गायींचे गट वाटप करण्यात येणार आहेत.

प्रतिदिन 8 ते 10 लि. दूध उत्पादन क्षमतेच्या सुधारित मुऱ्हा व जाफराबादी म्हशींचे वाटप करण्यात येते. वाटप करण्यात येणाऱ्या गायी व म्हशी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतातील असाव्या. तसेच दुधाळ गाई व म्हशी शक्यतो 1 ते 2 महिन्यापूर्वी व्यायलेल्या असाव्यात, असे निकषही शासन निर्णयानुसार स्पष्ट करण्यात आले आहेत.

English Summary: Distribution of indigenous desi cows for the promotion of milk production
Published on: 24 January 2019, 10:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)