News

यावेळी जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव पाटण येथील कुलभवानी शेतकरी उत्पादक कंपनीला महाडीबीटीअंतर्गत ४० टक्के अनुदानावर ड्रोन फवारणी यंत्र देण्यात आले. ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, हार्वेस्टर आदी अनुदान तत्वावरील अनेक उपसाधनांचे वितरण यावेळी करण्यात आले.

Updated on 04 September, 2023 12:19 PM IST

Buldana News :

बुलडाण्यात (दि.३) रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. यावेळी महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेतील विविध यंत्रसामुग्रीचे वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते यांच्या करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गैरहजर होते. त्यामुळे कार्यक्रम स्थळी विविध राजकीय चर्चा होत्या.

यावेळी जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव पाटण येथील कुलभवानी शेतकरी उत्पादक कंपनीला महाडीबीटीअंतर्गत ४० टक्के अनुदानावर ड्रोन फवारणी यंत्र देण्यात आले. ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, हार्वेस्टर आदी अनुदान तत्वावरील अनेक उपसाधनांचे वितरण यावेळी करण्यात आले.

नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन मदतीचा निधी देखील यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते जमा करण्यात आला. तर मेहकर तालुक्यातील ५० तलाठी कार्यालयांचे ऑनलाईन भूमिपूजन यावेळी संपन्न झाले आहे. ‘शासन आपल्या दारी’ अभियानावर आधारित कॉफी टेबलबुकचेही यावेळी प्रकाशनही पार पडले.

गेल्या काळात बंद पडलेल्या असंख्य सिंचन योजना नव्याने पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. ३२ सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता देण्यात आली आहे. यातून आठ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. नदीजोड प्रकल्प, दुष्काळग्रस्तांना मदत, महिलांना बस प्रवासात सवलत, ७५ हजार पदभरती असे अनेक हिताचे निर्णय घेतले आहेत,अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, केंद्र शासनाच्या सहकार्याने राज्याचा विकास करण्यात येत आहे. महिलांच्या विकासासाठी बचतगटांना चालना देण्यात येत असून बचतगटांना स्वस्त व्याजदराने कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच विपणनाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दरम्यान, पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, शासन आपल्या दारी उपक्रम सुरू केल्यापासून शासकीय यंत्रणा सक्रिय झाली असून नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचत आहे. राज्यात सातत्याने कार्यक्रम घेण्यात आले आहे. यातून आतापर्यंत एक कोटी लाख नागरिकांना लाभ देण्यात आला आहे. या उपक्रमातून नागरिकांच्या दारापर्यंत जाणारे देशातील एकमेव राज्य आहे. अभियानातून बुलडाणा जिल्ह्यात आजच्या दिवशी १ लाख तर आतापर्यंत १७ लाख ४३ हजार नागरिकांना लाभ देण्यात आला आहे.

English Summary: Distribution of agricultural mechanization to farmers by Chief Minister Shasan Aplya Dari
Published on: 04 September 2023, 12:19 IST