News

अनेक ठिकाणी शेतातील बांधावरून वाद होतो, तसेच शेतात जाण्यासाठी रोडवरून देखील मोठा प्रमाणावर गावात वाद असतात. आता लातूर येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या हस्ते आज औसा ( Ausa )तालुक्यात शेत रस्त्यांचे लोकार्पण होणार आहे. यामुळे शेतकरी आनंदात आहे.

Updated on 04 June, 2022 2:25 PM IST

अनेक ठिकाणी शेतातील बांधावरून वाद होतो, तसेच शेतात जाण्यासाठी रोडवरून देखील मोठा प्रमाणावर गावात वाद असतात. आता लातूर येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या हस्ते आज औसा ( Ausa )तालुक्यात शेत रस्त्यांचे लोकार्पण होणार आहे. यामुळे शेतकरी आनंदात आहे. शेत रस्त्यांचे अनेक वर्षांपासूनचे वाद मिटल्याने शेतकरी समाधानी आहेत. खेडेगावात अनेक ठिकाणी यावरून मोठे वाद होत असल्याचे दिसून येते. अनेकांचे जीव देखील यामध्ये गेले आहेत.

औसा येथे शेतकऱ्यांनी समंजस्याने हे रस्ते केले आहेत. आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांनी पुढाकार घेत शेतरस्त्याची चळवळ यशस्वी केली असून 1 हजार 300 किलोमीटर शेत रस्त्यांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतात जाण्यासाठी रस्ते झाल्याने मशागतीची कामे एकदम जलद गतीने होणार आहेत.

फडणवीस हे 1 हजार 300 किमी शेत रस्त्याचे लोकार्पण करणार आहेत. तसेच ते औसा येथे शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार आहेत. फडणवीस शेतकरी मेळाव्यात काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सभेची तयारी पुर्णपणे झाली आहे. स्वागतासाठी अधिक बॅनर लावले असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे. यामुळे आता पावसाळा येण्याआधी शेतकऱ्यांना शेतातील कामे करायला गती मिळणार आहे.

चंद्रपुरात अख्खं मार्केट आपलय..! शेतकऱ्यांची मॉलमधून शेतीमालाची विक्री, शेतकरीच झाले व्यापारी

सध्या अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे, अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस सुरूवात झाली असून अनेक शेतकऱ्यांनी मशागतीला सुरूवात केली आहे. यंदा पाऊस शेतीला पूरक असल्याने शेतकरी वर्गात मोठा आनंद असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे बियाणे खरेदी तसेच मशागतीच्या कामांना त्याठिकाणी त्यांची लगबग सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या;
Vidhan Parishad Election: भाजपचं ठरलं! विधान परिषदेसाठी हर्षवर्धन पाटील फिक्स? भाजपने आखली खास रणनीती
आधी अण्णा हजारेंकडे 6 हजाराने कामाला, पट्ठ्या आज शेतीतुन कमवतोय वार्षिक 6 कोटी रुपये, वाचा नेमकं काय केलं
दुकानदाराने खते दिली नाहीत तर मोबाईवर चेक करा खतसाठा, खत विक्रेत्यांच्या मनमानीला लगाम

English Summary: Disputes over farm roads have been settled years, farmers satisfied, Fadnavis
Published on: 04 June 2022, 02:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)