गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर आयकर विभागाच्या धाडी टाकण्याचे सत्र सुरु आहे. यामुळे याची चर्चा सुरु आहे. अनेक नेत्यांचे कारखाने आणि त्यांची चौकशी देखील केली जात आहे. असे असताना आता सोलापूरमध्ये आयकराच्या धाडी पडल्याने खळबळ उडाली आहे. साखर कारखानदारी क्षेत्रातलं मोठं नाव असलेल्या अभिजीत पाटील (Abhijeet Patil ) यांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाने (Income Tax Department) धाडी टाकल्या आहेत.
पाटील यांनी एकापाठोपाठ एक असे चार साखर कारखाने विकत घेतले आहेत. या ठिकाणीच आज आयकर विभागाची पथकं दाखल झाली असून, तपासणी सुरु करण्यात आली आहे. यामुळे आता या चौकशीमधून काय समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंढरपूरचे रहिवासी असलेले अभिजीत पाटील हे एक साखर उद्योगातील बडे प्रस्थ समजले जाते.
अल्पावधीतच त्यांनी अनेक कारखाने घेतले. अभिजीत पाटील हे युवा उद्योजत आहेत. सध्या त्यांच्या ताब्यात एकूण सहा साखर कारखाने आहे. आज त्यांच्या उस्मानाबाद, नांदेड आणि नाशिक येथील खासगी साखर कारखान्यावर आयकर विभागानं धाडी टाकल्या आहेत. सकाळीच ही बातमी समजताच सोलापूर जिल्ह्यात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.
देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय, आणि विद्यार्थी लटकून नदी पार करत आहेत
तसेच पंढरपूरमधील त्यांच्या कार्यालयावरही आयकर विभागानं छापेमारी केली आहे. अल्पावधीत साखर उद्योगातील ही प्रगती पाहून याबाबत कायमच उलट सुलट चर्चा सुरु होत्या. अभिजीत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून बंद पडलेला कारखाना चालवायला घेऊन गेल्या वर्षी तो यशस्वीपने चालवून दाखवला होता.
अगदी काही महिन्यातच ते कारखाने सुरळीतपणे सुरु करत होते. यामुळे त्यांची नेहमी चर्चा होत होती. पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवून अभिजीत पाटील यांनी दणदणीत विजय मिळवत तो कारखाना देखील ताब्यात घेतला आहे. हा कारखाना पंढरपूर तालु्क्यातील महत्वाच्या कारखाना म्हणून ओळखला जातो.
Milk FRP; दुधाला एफआरपी लागू करण्यासाठी किसान सभा होणार आक्रमक, घेतला मोठा निर्णय
दरम्यान, अभिजीत पाटील यांच्यामागे राष्ट्रवादीतील बड्या घराण्याचा पाठिंबा असल्याचीही चर्चा सुरु होती. यामुळे आता ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. आता येणाऱ्या काळात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अभिजीत पाटलांचे सध्या तालुक्यात राजकीय वजन देखील वाढत आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
मोठी बातमी! आता 'या' वाहनांमध्ये CNG आणि LPG किट लावा, केंद्राने दिली परवानगी..
'शहाजीबापू पाटील यांच्यामुळे त्यांच्या भावावर गळफास लावून आत्महत्या करण्याची वेळ आली'
शिंदे-फडणवीस सरकारची राज्यपाल नियुक्त १२ नावांची यादी समोर, वाचा कोणाची लागणार वर्णी?
Published on: 25 August 2022, 02:35 IST