News

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (Vasantdada Sugar Institute ) येथे आज राज्यातील साखर उत्पादन आणि साखर कारखानदारीसंदर्भात बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची नियमित बैठक मंगळवारी झाली.

Updated on 19 June, 2021 9:41 AM IST

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (Vasantdada Sugar Institute ) येथे आज राज्यातील साखर उत्पादन आणि साखर कारखानदारीसंदर्भात बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची नियमित बैठक मंगळवारी झाली.

या बैठकीला प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. या बैठकीत साखर उत्पादन, साखर उद्योगासमोरील समस्या, साखरेची विक्री, साखर कारखान्यांच्या उत्पादन वाढी संदर्भात चर्चा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली

हेही वाचा : शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळांनी कालमर्यादेत बियाणे तपासणी अहवाल द्यावा: कृषीमंत्री

सध्या साखर विक्री होत नाही, साखरेला उठाव नाही, व्यापारी साखर खरेदीसाठी येत नाहीत. साखर कारखान्यांच्याबाबत उत्पन्न वाढी संदर्भात चर्चा झाली. साखर कारखान्याची गोदामं आहेत, त्यावर सोलर पॅनेल बसवण्याबाबत चर्चा झाली, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. काही कंपन्यांनी साखर कारखान्यांना गोदाम निर्मिती करुन देतो. त्यावर 25 वर्षांसाठी सोलर पॅनेल उभारण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव चर्चा झाली आहे. साखर कारखान्यांमध्ये प्रेसमड निघतं त्यापासून सीएनजी गॅस निर्मितीबाबत चर्चा झाली. रोहतक येथे असा प्लँट उभारण्यात आला आहे, त्याविषयी चर्चा झाली.

साखर कारखाने फक्त ऊसापासून साखर तयार करत होते. आता को-जनरेशन प्रकल्पाद्वारे वीज निर्मिती, डिस्टलरी प्रकल्प, इथेनॉल तयार करण्यात येऊ लागलं. ही इंडस्टी टिकावी आणि शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळावेत, यासाठी चर्चा करण्यात आली, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

 

जालना जिल्ह्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं प्रशिक्षण केंद्र

आजच्या बैठकीत यंदा साखर उत्पादन जास्त झालं आहे. त्याचा साठा करण्याबाबत चर्चा झाली. साखरेच्या बाय प्रोडक्टमधे वाढ करण्याचा प्रयत्न करणं आणि यातून उसाचा दर वाढवण्यास मदत होईल. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर 128 एकर जागेसाठी टेंडर भरले होते. ते मंजुर झाले. हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे राज्यातील चौथे प्रशिक्षण केंद्र असेल. यामुळे मराठवाड्याला फायदा होईल, असं अजित पवार म्हणाले.

English Summary: Discussion on Solar Energy, CNG Gas Production at Vasantdada Sugar Institute Meeting
Published on: 19 June 2021, 09:38 IST