News

शेतकऱ्याचा नादच खुळा. सोयाबीनचे नवीन वाण शोडले आहे. चंद्रपूरचे प्रगतिशील शेतकरी सुरेश गरमडे यांनी सोयाबीनच्या एका नव्या वाणाचा शोध लावला आहे.

Updated on 18 February, 2022 4:42 PM IST

चंद्रपूरचे प्रगतिशील शेतकरी सुरेश गरमडे यांनी सोयाबीनच्या एका नव्या वाणाचा शोध लावला आहे. चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यातील वायगाव-भोयर या गावातील शेतकरी सुरेश गरमडे राहणार आहेत. गरमडे यांनी शोधलेल्या सोयाबीनच्या वाणाला केंद्र सरकारच्या दिल्ली येथील वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाने (Protection of Plant Varieties and Farmers' Rights Authority) कायदेशीर मान्यता दिली आहे.

सोयाबीन वाणासाठी असे अधिकार मिळवणारे गरमडे हे महाराष्ट्रातील पहिले शेतकरी ठरले आहेत. दशकभर प्रयत्न करून त्याचे स्वामित्व हक्क मिळविले आहेत. शेती क्षेत्रात शेतकऱ्यानेच केलेले हे संशोधन अनोखे ठरले आहे. रोगराईला बळी न पडणारी व भरघोस उत्पन्न देणारी एसबीजी ९९७ ही जात सोयाबीन लागवडीच्या क्षेत्रात क्रांती ठरण्याची शक्यता आहे. एसबीजी ९९७ नावाच्या सोयाबीन वाणासाठी गेले १२ वर्ष त्यांचे अथक प्रयत्न चालले होते.

हे ही वाचा : युवा शेतकऱ्याने अवघ्या २४ व्यावर्षी शेतीत केले भन्नाट प्रयोग; २० लाखांचे मिळवले उत्पादन

आनंदाची बातमी: "या" कर्मचाऱ्यांना होळीच्या दिवशी मिळणार पैसे

काही वर्षांपूर्वी स्वतःच्या शेतातील सोयाबीन रोपट्यांमध्ये त्यांना काही रोपटी वेगळी आढळल्याने त्यांचे १० वर्षे जतन -संवर्धन करत या भरघोस शेंगा असलेल्या वाणाची लागवड केली. या संपूर्ण प्रयत्नांची दखल चंद्रपूरचा कृषी विभाग- राहुरी कृषी विद्यापीठ व शासनाने वेळोवेळी घेतली होती.

नव्या सोयाबीन वाणाची वैशिष्ट्ये 

१. प्रतिकूल हवामानात देखील उत्तम उत्पादन.
२. एसबीजी-९९७ वाणाच्या झाडाची उंची ७५ सेंटीमीटरपर्यंत वाढते.
३. एका झाडाला १४० ते १५० शेंगा लागतात.
४. तीन ते चार दाण्याच्या शेंगा सर्वाधिक असतात.
५. इतर जातीच्या तुलनेत यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त आहे.
६. एकरी १७ क्विंटल उत्पादन
७. हे वाण प्रतिकूल हवामानातही 'यलो मोझॅक' रोगाला बळी पडत नाही.

शेतकरी उपयोगी वाणाचे पेटंट मिळवण्यासाठी गरमडे यांनी वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क संरक्षण कायदा २००१ अंतर्गत महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या पाठपुराव्यातून पुणे येथे स्थापन झालेल्या पेटंट प्राधिकरण कार्यालयात मे २०१८ मध्ये प्रस्ताव दाखल केला होता.

सोयाबीनचा उतारा सर्वाधिक व्हावा व रोगांपासून बचाव व्हावा यासाठी शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत असतात. अनुभवसिद्ध शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने आपलेच संशोधन शेवटापर्यंत नेत त्याचा उपयोग सामान्य शेतकऱ्यांसाठी केल्यास शेती सहकार्याचे नवे क्षेत्र उघडणारी ठरणार आहे.

हे ही वाचा : नैराश्य जागतिक आरोग्य संकट; नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी करा हे उपाय

English Summary: Discovered new varieties of soybeans
Published on: 18 February 2022, 04:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)