मागच्या वर्षी लाखो शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी विमायोजनेत सहभागी झाल्यानंतर देखील बरेच जिल्ह्यातीलशेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती.
याविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता व आंदोलन देखील करण्यात आली होती.पिक विमा कंपन्यांनी देखील हात वर केले होते त्यामुळे झालेल्या नुकसानीचे करायचे काय हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे होता दरम्यानपिक विमा योजना 2021 मध्ये जे शेतकरीसहभागी झाले होते अशा राज्यातील साडेनऊ लाख शेतकऱ्यांना 422 कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पिक विमा योजना खरीप 2021मध्ये सहभागी झालेल्या राज्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना 422 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचे वाटप चालू करण्यात आले आहे. मात्र राज्यातील तीन जिल्हे असे आहेत की या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी भरपाई देण्यास काही कारणामुळे आक्षेप घेतला असल्याने सध्यातरी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
तसेच काही जिल्ह्यांनी या प्रक्रियेला आक्षेप घेतला असल्यामुळे त्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे पण त्यामुळे सध्या ज्या जिल्ह्यांमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही अशा आक्षेप नसलेल्या 422 कोटी रुपयांची भरपाई रक्कम राज्यभर वाटली जात असल्याचे माहिती मिळत आहे.
नुकसानीच्या प्रकारानुसार जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे वाटप झालेले आहे.पीक कापणी प्रयोगाअंती आलेल्या भरपाई का रखडली निष्कर्षांच्या आधारे राज्यात कमीत कमी 800 कोटी रुपये वाटणे अपेक्षित असून हा आकडा अंतिम आहे. परंतू राज्यातील काही जिल्ह्यात विमा कंपन्यांनी आक्षेप नोंदवला असून तेथे शेतकऱ्यांना लाभ होण्याची शक्यता कमी आहे.
या जिल्ह्यांमध्ये नाशिक, परभणी आणि सोलापूर जिल्ह्याचा समावेश असूनया जिल्ह्यांमध्ये कंपन्यांनी काही आक्षेप नोंदवला आहे.
महत्वाच्या बातम्या
Published on: 27 May 2022, 09:43 IST