News

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला राज्यातील सत्ता संघर्ष आता कोर्टात पोहोचला आहे. यावर सध्या सुनावणी सुरू आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला आणि आम्हीच शिवसेना असल्याचा दावा केला होता. यामुळे हा वाद सुरू आहे.

Updated on 03 August, 2022 2:59 PM IST

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला राज्यातील सत्ता संघर्ष आता कोर्टात पोहोचला आहे. यावर सध्या सुनावणी सुरू आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला आणि आम्हीच शिवसेना असल्याचा दावा केला होता. यामुळे हा वाद सुरू आहे.

असे असताना आता शिवसेना कुणाची? असा पेच निर्माण झाला होता. या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावेळी शिंदे गटाकडून हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला आहे. त्यांनी आपली बाजू मांडली आहे. शिंदे गटाने शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेकडून याचिका दाखल करण्यात आली.

यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश एन.व्ही. रामन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पीठापुढे ही सुनावणी पार पडली. एकनाथ शिंदेंच्या वतीने वकिल हरिश साळवे, निरज कौल यांनी युक्तिवाद केला. तर शिवसेनेच्या वतीने वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. यामुळे आता काय होणार याकडे सर्व आमदारांचे लक्ष लागले असताना याबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे.

काय सांगता! एकही रुपया न भरता महिंद्रा स्कॉर्पिओ-एन खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या..

तसेच यामध्ये राज्यपालांच्या वतीने वकील तुषार मेहता यांनी बाजू मांडली. यावेळी साळवे म्हणाले की, बहुमत गमावलेल्या पक्षासाठी पक्षातर बंदी कायदा हा शस्त्रासारखा वापरू शकत नाही. शिवसेनेत उरलेले 15 आमदार हे स्वत:ला वाचवण्यासाठी दावा करू शकत नाही. इथं कुणी पक्षच सोडलेला नाही.

पक्षांतर विरोधी कायदा हा इथं लागू होत नाही. जेव्हा तुम्ही तुमचा राजकीय पक्ष सोडता तेव्हा पक्षांतर विरोधी कायद्याचा मूळ आधार असतो. कोणालाही अपात्रता आढळली नाही. मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर समाधानी नसलेले आणि बदल घडवणारे आमदार मोठ्या संख्येने असतील, तर नेतृत्वाची नवी स्पर्धा असावी असे ते का म्हणू शकत नाहीत?

बातमी कामाची! शेतकऱ्यांनो दुधाचे उत्पादन वाढवण्याची सोपी पद्धत सापडली, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

तसेच बंडखोर आमदारांना अपात्र गृहित धरुन ठाकरे गटाचा युक्तिवाद केला आहे. मुख्यमंत्र्यांकडे बहुमत नव्हते त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. ते बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत. म्हणजे त्यांनी बहुमत गमावले होते. अध्यक्षांची निवड बहुमताने झाली आहे. अध्यक्षांना ठरवू द्या, असेही सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या;
आता शेतकऱ्यांना पंप संच घेण्यासाठी मिळणार २० हजार रुपये, असा घ्या लाभ..
पावसाळ्यात पडणार पैशांचा पाऊस, ६०% अनुदानावर मत्स्यशेती सुरू करा, २ लाखांचे कर्जही मिळणार..
एकही रुपया न गुंतवता सुरु करा कुक्कुटपालन, दरवर्षी मिळेल लाखोंचा नफा, वाचा सोप्पी पद्धत..

English Summary: Direct question court Shinde group, possibility going against decision
Published on: 03 August 2022, 02:59 IST