News

दिपोत्सवासाठी आजी माजी राष्ट्रीय खेळाडूंनी उपस्थित दर्शवली. या कार्यक्रमास मंत्रालय जिमखाना मानस सचिव प्रताप माडकर, नगरसेवक राष्ट्रीय खेळाडू दादा चोरमले, वनविभाग अधिकारी सारिका जगताप, कृषी मंडलाधिकारी उपस्थित होते.

Updated on 15 November, 2023 1:41 PM IST

Satara News : दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून यंदाही साताऱ्यातील साखरवाडी क्रीडा मंडळाच्या मैदानावर ३ हजार पणत्या प्रज्वलित करून दिपोत्सव साजरा करण्यात आला. यंदाचे दिपप्रज्वलनाचे सहावे वर्षे होते. साखरवाडी क्रीडा मंडळ मागील पाच वर्षापासून हा दीपोत्सव साजरा करत आहे.

१९९६ साली क्रीडा मंडळाची स्थापना स्थापना झाली असून आतापर्यंत ६० वेळा या मंडळाने राज्य विजेते व उपविजेते पद पटकावले आहे. साखरवाडी क्रीडा मंडळचे अध्यक्ष दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते श्री संजय बोडरे यांनी आतापर्यंत अनेक उत्कृष्ट खेळाडू घडवले आहेत. त्यातील अनेक खेळाडू क्लासवन अधिकारी क्लास टू अधिकारी तसेच मंडळ कृषी अधिकारी अशा पदावर कार्यरत आहेत.

दिपोत्सवासाठी आजी माजी राष्ट्रीय खेळाडूंनी उपस्थित दर्शवली. या कार्यक्रमास मंत्रालय जिमखाना मानस सचिव प्रताप माडकर, नगरसेवक राष्ट्रीय खेळाडू दादा चोरमले, वनविभाग अधिकारी सारिका जगताप, कृषी मंडलाधिकारी उपस्थित होते. यावेळी दिपोत्सवासाठी गावातील नागरिक देखील उपस्थित होते. तसंच दिपोत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी देखील केली होती.

दरम्यान, साखरवाडी क्रीडा मंडळाच्या मैदानावरती साजरी ३ हजार पणत्यांचे दिपप्रज्वलन केल्यामुळे मैदान दिव्यांनी उजळले होते. तसंच यावेळी उपस्थितांनी फटाक्यांची आतषबाजी देखील केली. दिव्यांनी मैदान उजळल्यामुळे पाहण्यासाठी नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होती.

English Summary: Dipotsav celebration at Sakharwadi sports club ground in Satara
Published on: 15 November 2023, 01:41 IST