News

डिजिटल सातबारा मध्ये होणाऱ्या चुकांमुळे यावर्षी विविध कार्यकारी सोसायटी मधून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

Updated on 12 April, 2021 2:00 PM IST

डिजिटल सातबारा मध्ये होणाऱ्या चुकांमुळे यावर्षी विविध कार्यकारी सोसायटी मधून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

नव्याने सोसायटीकडून कर्ज घेताना साताऱ्यात झालेल्या चुकांमुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. काही ठिकाणी संबंधित शेतकऱ्याच्या नावे असलेले क्षेत्र डिजिटल सातबारा मध्ये कमी दाखवले गेल्याने कर्ज मर्यादा कमी होत आहे. शासनाने सर्व सातबारा खाते उतारा यांचा फेरफारचे ही ऑनलाईन केले आहेत. ज्या गावांमधली ऑनलाईन नोंदणी राहिलेली आहे अशा गावांमध्ये हस्तलिखित सातबारा उतारे मिळत आहेत.

परंतु बऱ्याचशा गावांचे ऑनलाइन उतारे करण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामध्ये काही प्रमाणात त्रुटी राहिलेले आहेत.या त्रुटी मध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या नावावरील क्षेत्र कमी दाखवणे तसेच काही ठिकाणी चुकीची आनेवारी  असणे,  तर काही ठिकाणी नावेच गायब आहेत. अशा चुका दुरुस्तीसाठी मागील सरकारने तहसीलदारांना सूचना केल्या होत्या. परंतु यामध्ये दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसत आहे.

 

आजही सातबारा मध्ये मोठ्या प्रमाणात चुका आहेत.त्या दुरुस्तीसाठी तालुकास्तरावर तेव्हा मंडलाधिकारी पातळीवर यंत्रणा सुरू करणे गरजेचे आहे.  सध्या ग्रामीण भागामध्ये सोसायटीचेपीककर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये नवीन सातबारा मागितले जातात. परंतु आता सर्वत्र डिजिटल सातबारा मिळत असून यामध्ये झालेल्या चुकांमुळे शेतकऱ्यांचे कर्ज मर्यादा कमी होत आहे.

 

कारण शेतकऱ्यांच्या नावावरून क्षेत्रच कमी झाल्याने कर्ज मर्यादा कमी होत  आहे. त्यामुळे नेमक्या पिक कर्ज घेण्याच्या तोंडावर शेतकऱ्यांना तलाठी, मंडळ अधिकारी व तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत.

English Summary: Digital satbara get barrier for society loan
Published on: 05 April 2021, 10:16 IST