News

राज्यांत गव्हाच्या जिरायत पेरणी ही १५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करावी.मर्यादित सिंचन उपलब्ध असल्यास २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर पर्यंत दरम्यान करावी. बागायती वेळेवर पेरणी १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत ,तर बागायत उशिरात उशिरा १५ डिसेंबर पर्यंत पेरणीपूर्ण करावी.

Updated on 19 October, 2023 12:21 PM IST

डॉ.आदिनाथ ताकटे, डॉ. अविनाश गोसावी

राज्यांत गव्हाच्या जिरायत पेरणी ही १५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करावी.मर्यादित सिंचन उपलब्ध असल्यास २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर पर्यंत दरम्यान करावी. बागायती वेळेवर पेरणी १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत ,तर बागायत उशिरात उशिरा १५ डिसेंबर पर्यंत पेरणीपूर्ण करावी. पेरणीकरिता जिरायत, मर्यादित सिंचन , बागायती वेळेवर तसेच बागायती उशिरा पेरणी करतांना योग्य त्या शिफारशीत वाणांची निवड करावी.

जिरायत पेरणीसाठी
पंचवटी (NIAW 15)
 प्रसारणाचे वर्ष -२००२
 जिरायतीत वेळेवर पेरणीसाठी शिफारसीत बन्सी वाण
 टपोरे, चमकदार व आकर्षक दाणे
 प्रथिने १२ %
 तांबेरा रोगास प्रतिकारक
 शेवया, कुरडईव पास्ता/माकॅरोनीसाठी उत्तम
 पक्व होण्याचा कालावधी १०५ दिवस
 उत्पादनक्षमता १२ ते १५ क्विंटल /हेक्टरी

एम ए सी एस ४०२८ (MACS 4028)
 जिरायत पेरणी करिता शिफारशीत बन्सी वाण
 पक्व होण्याचा कालावधी १००-१०५ दिवस
 ताबेरा रोगास प्रतिकारक
 प्रथिने १४.७ टक्के,जस्त ४० पी पी.एम ,लोह ४६ पी पी.एम
 शेवया ,कुरड्या,पास्ता साठी उत्तम जात
 उत्पादन :जिरायत १८-२० क्विंटल /हेक्टरी

मर्यादित सिंचनासाठी
नेत्रावती (NIAW 1415)
 प्रसारणाचे वर्ष – २०१०
 जिरायतीत किंवा एका ओलिताखाली शिफारसीत सरबती वाण
 तांबेरा रोगास प्रतिकारक
 प्रथिने १२ % पेक्षा जास्त
 चपातीसाठी उत्तम
 पक्व होण्याचा कालावधी: जिरायतीत १०५ दिवस व एका ओलिताखाली ११० दिवस
 उत्पादनक्षमता: जिरायती १८ ते २० क्विं./हे. एका ओलिताखाली २७ ते ३० क्विं./हे.

फुले सात्विक (NIAW 3170)
 बिस्कीट निर्मीती करिता सरबती वाण
 वेळेवर पेरणीसाठी,नियंत्रित पाण्यावर पेरणीसाठी शिफारस
 पिकाचा कालवधी ११५-१२० दिवस
 प्रथिने ११-१२%, जस्त ३०-३५ पीपीएम, लोह ३०-४० पीपीएम
 तांबेरा रोग प्रतिकारक
 उत्पादन ३५-४० क़्वि/हे ( एका ओलिताखाली)

फुले अनुपम (NIAW3624)
 गव्हाचा सरबती वाण, नियंत्रित पाण्यावर पेरणीसाठी शिफारस
 महाराष्ट्रात एका ओलिताखाली,वेळेवर पेरणीसाठी शिफारशीत
 चपातीसाठी उत्तम वाण,
 आकर्षक टपोरे दाणे,प्रथिने ११.४ %
 पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता
 तांबेरा रोगास प्रतिकारक
 कालावधी १०५-११० दिवस
 उत्पादन- ३०-३५ क़्वि/हे (एका ओलिताखाली)

बागायती वेळेवर पेरणीसाठी
त्रंबक (NIAW 301)
 प्रसारणाचे वर्ष २००१
 महाराष्ट्रात वेळेवर बागायती पेरणीसाठी शिफारसीत सरबती वाण
 मध्यम टपोरे दाणे, प्रथिने १२% पेक्षा अधिक
 तांबेरा रोगास प्रतिकारक
 चपातीसाठी उत्तम
 पक्व होण्याचा कालावधी ११५ दिवस
 उत्पादनक्षमता ४० ते ४५ क्विंटल/हेक्टरी

तपोवन (NIAW 917)
 प्रसारणाचे वर्ष -२००५
 बागायतीत वेळेवर शिफारसीत सरबती वाण
 मध्यम टपोरे दाणे
 प्रथिने १२.५ टक्क्या पेक्षा अधिक
 तांबेरा रोगास प्रतिकारक
 चपातीसाठी उत्तम
 पक्व होण्याचा कालावधी ११५ दिवस
 उत्पादनक्षमता ४५ ते ५० क्विंटल/हेक्टरी

गोदावरी (NIDW295)
 प्रसारणाचे वर्ष -२००५
 बागायतीत वेळेवर पेरणीसाठी बक्षी वाण
 टपोरे, चमकदार व आकर्षक दाणे
 प्रथिने १२ %
 तांबेरा रोगास प्रतिकारक
 शेवया मायक्रोनी ,कुरड्या व पास्ता यासाठी उत्तम यासाठी उत्तम,
 पक्व होण्याचा कालावधी ११०-११५ दिवस
 उत्पादनक्षमता ४५ ते ५० क्विंटल/हेक्टरी

फुले समाधान (NIAW 1994)
 प्रसारणाचे वर्ष -२०१४
 बागायती वेळेवर किंवा उशिरा पेरणीसाठी एकमेव शिफारशीत सरबती वाण
 तांबेरा रोगास प्रतिकारक
 प्रथिने १२ % पेक्षा जास्त
 चपातीसाठी उत्तम
 पक्व होण्याचा कालावधी : बागायतीत वेळेवर पेरणीखाली ११५ दिवस व उशिरा ११० दिवस
 उत्पादनक्षमता: बागायती वेळेवर ४५ ते ५० क्विंटल/हेक्टरी
बागायती उशिरा पेरणीखाली ४२ ते ४५ क्विंटल/हेक्टरी

बागायत उशिरा पेरणीसाठी
निफाड ३४ (NIAW 34)
 प्रसारणाचे वर्ष -१९९५
 बागायतीत उशिरा पेरणीसाठी शिफारसीत सरबती वाण
 मध्यम टपोरे दाणे
 प्रथिने १३ % पेक्षा अधिक
 तांबेरा रोगास,मावा किडीस प्रतिकारक
 चपातीसाठी उत्तम
 पक्व होण्याचा कालावधी १०० दिवस
 उत्पादनक्षमता ३५ ते ४० क्विंटल/हेक्टरी (उशिरा पेरणी खाली)

खपली वाण
डी डी के १०२५ ( DDK 1025)
 प्रसारण २००६
 बागायती वेळेवर पेरणी
 पक्वता कालावधी १०५-११० दिवस
 उत्कृष्ट दाणे, ब्रेड ,बेकरी उत्पादने ,पास्ता,मायक्रोनी,चपाती साठी उत्तम
 उत्पादन ४५-४६ क्विंटल/हेक्टरी


डी डी के १०२९ ( DDK 1029)
 प्रसारण २००७
 पक्वता कालावधी १०० -१०५ दिवस
 बागायती वेळेवर पेरणी
 रोग प्रतिकारक्षम, ,तापमानास सहनशील
 उत्कृष्ट दाणे
 उत्कृष्ट दाणे, ब्रेड ,बेकरी उत्पादने ,पास्ता,मायक्रोनी,चपाती साठी उत्तम
 उत्पादन ४५-४६ क्विंटल/हेक्टरी

एम ए सी एस २९७१ (MACS 2971)
 प्रसारण २००९
 बागायती वेळेवर पेरणी
 पक्वता कालावधी १०६ दिवस
 डी डी के १०२९ या वाणा पेक्षा सरस
 रोग प्रतिकारक्षम ,तांबेरा रोगास प्रतिकारक्षम
 खीर ,उपमा,पुरणपोळी व द्लीचा ई.पदार्थ बनविण्यास
 मधुमेही रुग्णांसाठी उपयोगी वाण
 सहज पचन क्षमतेसह चांगले गुणवत्ता गुणधर्म
 उत्पादन ५०-५२ क्विंटल/हेक्टरी

गहू लागवड तंत्रज्ञान
जमीन : • पाण्याचा चांगला निचरा होणारी,भारी जमिन योग्य
पूर्व मशागत : • २०-२५ से.मी. खोल नांगरट करावी. हेक्टरी २५ ते ३० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत टाकावे. दोन वेळा कुळवणी करावी.

पेरणी कालावधी : • जिरायत गहू – १५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर
• मर्यादित सिंचन -२५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर
• बागायती वेळेवर – १ ते १५ नोव्हेंबर
• बागायती उशिरा- १५ डिसेंबर पर्यंत
• पेरणी १५ नोव्हेंबर नंतर केल्यास प्रत्येक पंधरवड्यात हेक्टरी २.५ क्विंटल ऊत्पादन कमी येते.

पेरणी पद्धत
• पेरणी उथळ म्हणजे ५ ते ६ से.मी खोल करावी.पेरणी अंतर २० से.मी ठेवावे
• पेरणी उभी-आडवी अशी दोन्हीबाजूने न करता ती एकेरी करावी.
• जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी २.५ ते ४ मीटर रुंदीचे व ७ ते २५ मीटर लांब आकाराचे सारे पाडावेत

हेक्टरी बियाणे :
• जिरायत पेरणीसाठी ७५ ते १०० किलो
• बागायती वेळेवर पेरणीसाठी १०० ते १२५ किलो
• बागायती उशिरा पेरणीसाठी १२५ ते १५० किलो

वाण :
• जिरायत :पंचवटी ,शरद,एम ए सी एस ४०२८
• मर्यादित सिंचन:नेत्रावती, फुले अनुपम ,फुले सात्विक ,एन आय ए डब्लू ११४९,एम ए सी एच ४०५८
• बागायती वेळेवर पेरणी:फुले समाधान,तपोवन, गोदावरी ,त्र्यंबक,एमएसीएस ६१२२
• बागायती उशिरा पेरणीसाठी फुले समाधान , एनआयएडब्लू ३४ या वाणाची पेरणी करावी.
बीजप्रक्रिया :
• पेरणीपूर्वी कॅप्टन किंवा थायरम या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी
• तसेच प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅकटर व २५० ग्रॅम पीएसबी या जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी.

खत व्यवस्थापन :
• जिरायत : ४० :२०:२० किलो/हेक्टरी नत्र : स्फुरद : पालाश
• मर्यादित सिंचन :८० :४० ४० किलो/हेक्टरी नत्र : स्फुरद : पालाश
• बागायत वेळेवर पेरणी : १२०: ६०: ४० किलो/हेक्टरी नत्र : स्फुरद : पालाश
• बागायत उशिरा पेरणी :९० :६०:४० किलो/हेक्टरी नत्र : स्फुरद : पालाश

आंतर मशागत :
• बागायत वेळेवर आणि उशिरा पेरलेल्या गव्हास तीन आठवड्यानी खुरपणी करावी.
• पीक कांडी अवस्थेत आले की मजुरांच्या सहाय्याने तणांचा बंदोबस्त करता येत नाही.पिकांची नासाडीच जास्त होण्याची शक्यता असते.अशा परिस्थितीत तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करणे फायद्याचे ठरते.

पाणी व्यवस्थापन
• भारी जमिनीकरिता १८ दिवसांच्या अंतराने ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
• मध्यम जमिनीसाठी १५ दिवसाच्या अंतराने ७ पाळ्या द्याव्यात.
• हलक्या जमिनीस १०-१२ दिवसाच्या अंतराने ८ ते १० पाळ्या द्याव्यात.
• परंतु पीक वाढीच्या महत्वाच्या अवस्थेत पाणी देणे फायदेशीर ठरते.
• जर एकच पाणी देण्याइतके उपलब्ध असेल,तर पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी गव्हास पाणी दयावे.
• दोन पाणी देण्याइतका पाणीसाठा उपलब्ध असेल तर पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी आणि दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी दयावे.
• तीन पाण्याच्या पाळ्या देणे शक्य असेल तर पहिले पाणी २० ते २२,दुसरे ४२ ते ४५ व तिसरे ६० ते ६५ दिवसांनी दयावे.
• अशा रीतीने सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून गव्हाचे ऊत्पादन घ्यावे.


फुले समाधान ( एन आय ए डब्लू १९९४)
 महाराष्ट्रात बागायती वेळेवर तसेच उशिरा पेरणीसाठी सरबती गव्हाचा वाण
 तांबेरा रोगास तसेच मावा किडीस देखील प्रतिकारक्षम.
 टपोरे व आकर्षक दाणे,
 प्रथिनांचे प्रमाण १२.५ ते १३.८ टक्के,
 चपातीची प्रत उत्कृष्ठ व प्रचलित वाणांपेक्षा सरस ,
 कालावधी :बागायतीत वेळेवर ११५ दिवस व बागायतीत उशिरा पेरणीखाली ११० दिवस
 उत्पादन बागायती वेळेवर ४५ ते ५० क्विं./हे. बागायती उशिरा पेरणीखाली ४२ ते ४५ क्विं./हे.

लेखक - डॉ.आदिनाथ ताकटे,मृद शास्रज्ञ एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषि विदयापीठ ,राहुरी
डॉ. अविनाश गोसावी, सहयोगी प्राध्यापक, मृद शास्रज्ञकृषि महाविद्यालय,पुणे

English Summary: Different varieties of wheat for rabbi their characteristics know in detail rabbi season
Published on: 19 October 2023, 12:21 IST