News

आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढत आहेत त्यामुळे केंद्र सरकारने गेल्या दोन महिन्यांत डिझेलच्या दरात तब्बल 10 रुपयांनी वाढ केली आहे. परिणामी, राज्यात डिझेलची सरासरी किंमत १०५ रुपयांच्या आसपास आहे.

Updated on 08 May, 2022 4:44 PM IST

आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढत आहेत त्यामुळे केंद्र सरकारने गेल्या दोन महिन्यांत डिझेलच्या दरात तब्बल 10 रुपयांनी वाढ केली आहे. परिणामी, राज्यात डिझेलची सरासरी किंमत १०५ रुपयांच्या आसपास आहे. दरम्यान, डिझेलच्या दरात वाढ झाल्याने महागाई झपाट्याने वाढली आहे.  डिझेल दरवाढीमुळे दळणवळणाचे भाव वाढले आहेत. याचा फटका सर्वच जनतेला बसत आहे. डिझेल दरवाढीचा फटका शेतकऱ्यांनाही बसत आहे.  

शेतकरी आधीच भयंकर संकटाचा सामना करत आहेत, त्यातच डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत, यामुळे शेती मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना मागील वर्षाहून अधिक खर्च करावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या दरवाढीचा फटका मोठ्या प्रमाणात शेतीला बसला आहे.  

शेतीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. ट्रॅक्टरद्वारे लागवडीचा खर्च सुमारे २५% वाढला आहे. त्यामुळे इंधन दरवाढीचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ट्रॅक्टरमुळे तीन दिवसांचे काम आता एका दिवसात होत असले तरी इंधन दरवाढीमुळे उत्पन्न आणि खर्चाचे बजेट कोलमडत आहे.

सध्या शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. राज्याच्या बहुतांश भागात बैल पालन ठप्प झाले आहे. नांगरणी, पेरणी, रोटाव्हेटर मारणे, मळणी आणि चाळणीसाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. दुसरीकडे भाजीपाल्यासह अन्य पिकांना अपेक्षित दर मिळालेला नाही.

इंधन दरवाढीमुळे वाहतूक महाग झाली आहे. गतवर्षी एकरी १०,००० रुपये असलेला खर्च आता प्रति घर २०,००० रुपयांवर जात आहे. तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे. शेतीसाठी उत्पादन खर्च, मालाचे बाजारभाव व इतर खर्च आवाक्याबाहेर आहेत.

मागील वर्षीचा दर (प्रति एकर): नांगरणी: १८००, रोटर मारणे: १२५० , पेरणी: १५००चालू वर्षीचे दर (प्रति एकर) नांगरणी: २४५०, रोटर मारणे: १७५०, पेरणी: २०५०

तसेच शेतीसाठी लागणारे खते, औषधे, बी बियाणे यांचा खर्चही वाढत आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. वाढत्या महागाईचा फटका शेती क्षेत्रालाही बसताना आपण पाहत आहोत.

महत्वाच्या बातम्या
Weather Frorecast : बंगालच्या उपसागरात वादळ; महाराष्ट्रावर काय होणार परिणाम; वाचा 

English Summary: Diesel price hike hits agriculture
Published on: 08 May 2022, 04:43 IST