News

यावर्षी अतिवृष्टी होऊन भरपूर पिकांचे नुकसान झाले. त्याला सोयाबीनही अपवाद नाही. मागणीच्या मानाने प्रचंड कमी उत्पादन झाल्याने बऱ्याच दिवसांपासून सोयाबीनच्या दरात तेजीची परिस्थिती बघायला मिळत आहे.

Updated on 28 October, 2020 2:30 PM IST


यावर्षी अतिवृष्टी होऊन भरपूर पिकांचे नुकसान झाले. त्याला सोयाबीही अपवाद नाही. मागणीच्या मानाने प्रचंड कमी उत्पादन झाल्याने बऱ्याच दिवसांपासून सोयाबीनच्या दरात तेजीची परिस्थिती बघायला मिळत आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमी भावानुसार ३८८० रुपये दर आपल्याला मिळेल. परंतु आता बाजारात ४ हजार ते साडेचार हजार रुपयांच्या भावापर्यंत सोयाबीन खरेदी केले जात आहे. जगाचा विचार केला तर ब्राझील, अमेरिका इत्यादी देशांमध्ये सुद्धा शेतमालाचे उत्पादन प्रचंड घातल्याने सोयाबीनचे दरात आणखी उच्चांकी वाढ पाहायला मिळू शकते. ४ हजार ७०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून वर्तविण्यात येत आहे.

महाराष्ट्राच्या आजूबाजूचा राज्यांमधून विशेषतः मध्यप्रदेश मधून सोयाबीनच्या चांगल्या प्रकारच्या आवक महाराष्ट्रात होते. परंतु मध्य प्रदेशमध्येही झालेल्या अतिपावसामुळे तिथल्या सोयाबीन पिकावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे मागणीच्या प्रमाणात पुरवठा फारच कमी असल्याने काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात मोठी वाढ दिसून आली आहे. आता पाऊस थांबल्याने बऱ्यापैकी सोयाबीनची आवक मार्केटमध्ये दिसून येत आहे.

त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शेतमालाच्या दरात २०० रुपयांपर्यंत घट येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. परंतु अशा प्रकारची स्थिती जास्त दिवस टिकणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये सुद्धा सोयाबीनची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्याने सोयाबीनच्या दरात पुढे वाढवण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांच्या मतानुसार रुपये चार हजार 400 प्रति क्विंटलपर्यंत आहे भावा पोहोचण्याची शक्यता आहे. 

 

English Summary: Did the farmers hear! Soybean prices likely to rise
Published on: 28 October 2020, 02:29 IST