1. बातम्या

शेतकऱ्यांनो ऐकलं का ! आता वीस वर्ष मिळणार मोफत विज

ग्रामीण भागात भार नियमनाचा त्रास हा नेहमीचाच असतो. विजे नसल्याने अनेकांची कामे ठप्प होत असतात. मग ती शेतातील पिकांना पाणी देणे असो किंवा इतर दुकानातील कामे. इतर कामे आपण विज नसल्याने थांबवू शकतो.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


ग्रामीण भागात भार नियमनाचा त्रास हा नेहमीचाच असतो. विजे नसल्याने अनेकांची कामे ठप्प होत असतात. मग ती शेतातील पिकांना पाणी देणे असो किंवा इतर दुकानातील कामे. इतर कामे आपण विज नसल्याने थांबू शकतो. पण घरात लाईट नसली की, आपल्याला मोठी सतावत असते. पण आता ही चिंता मिटणार आहे, कारण विसाका इंडस्ट्रीज लिमिटेडने एक एटीयूएम सौरछताची निर्मिती केली आहे. ही विज निर्मिती पुर्णपणे इको फेंड्रली पद्धतीने केली जाते. यासाठी विसाका इंडस्ट्रीज लिमिटेडला वीस वर्षासाठी पेटंट प्रदान करण्यात आले आहे.

एटीयूएम हे आगऴेवेगळ्या प्रकारचे छत असून ते वीजनिर्मिती करते. पुर्णपणे एकात्मिक आणि निरंतर कार्यरत राहणारे हे सोलर छत पॉली अथवा मोनो क्रिस्टलाईन सोलर सेलपासून बनविण्यात आलेले आहे. या छताला सिमेंट बोर्डची जोड असल्याने ते अतिशय टिकाऊ बनले असून थेट छत म्हणून वापरता येणारे जगातील पहिले सोलर पॅनेल ठरले आहे. विसाकाने या सोलर पॅनेलसाठी विकसित केलेल्या एटीयूएम तंत्रज्ञानाला इंटरनॅशनल इलेक्ट्रोकेमिकल कमिशनच्या निकषांनुसार आंतरराष्ट्रीय पातळीवरील यूएल प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. दरम्यान हे सौरछत प्रतिचौरस फूटावर 780 पौंड वजन तर हिवाळ्यात 2200 पौंडएलबीएस वजनाचे बर्फ पेलू शकते. एवढेच नव्हे तर छत एकमेकांना जोडण्याची पध्दतही लीकप्रूफ असून जोडपध्दतीलाही अमेरिकन सोसायटी फॉर टेस्टिंग अॅण्ड मटेरियलच्या निकषांनुसार पेटंट देण्यात आलेले आहे. या सोलर छताला आगप्रतिबंधाबाबत क्लास ए रेटींग देण्यात आलेले असून दीडशे किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासमोरही टिकाव धरत असल्याने वादळातही ते टिकू शकते.

पारंपारिक सोलर छतांच्या तुलनेत एटीयूएम छतात उपलब्ध क्षेत्रफळात 20 ते 40 टक्के अधिक वीजनिर्मितीची क्षमता असल्याने आपल्या घराच्या छताच्या क्षेत्रफळाचा पुरेपुर वापर करत सोलर वीजनिर्मितीसाठी उत्तम असा पर्याय ठरला आहे. पारंपारिक सोलर छतांच्या तुलनेत एटीयूएम छत 20 ते 40 टक्के अधिक वीजनिर्मिती करते. एटीयूएमची डिझाईन आकर्षक असून ते अतिरिक्त क्षेत्रफळ मिळवून देते. तर पारंपारिक छतांमध्ये ते मिळत नाही. त्यामुळे चारपेक्षा कमी वर्षात एटीयूएमवरील गुंतवणूकीचा खर्च ( आरओआय) वसूल होत असल्याने या छतातीत गुंतवणूक अधिक आकर्षक ठरते. परिणामी चारपेक्षा कमी वर्षात ग्राहकांचा खर्च वसूल होत असल्याने पुढील 25 वर्षभर त्यांना मोफत वीजेचा आनंद मिळतो.

विसाका इंडस्ट्रीज लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक वामसी गड्डम कंपनीच्या या यशाबद्दल बोलताना म्हणाले की, एटीयूएम अविष्कार म्हणजे वीजनिर्मितीसाठीचे जगातील पहिले सोलर छत असून या संकल्पनेवर मी 2016 पासून संशोधन करत होतो. आम्ही मार्च 2017 मध्ये पेटंटसाठी अर्ज सादर केला. तेथे यासारख्याच जागतिक पेटंटबाबतचे दावे खोडून काढत आम्ही तयार केलेल्या एटीयूएमचे वैशिष्टे स्पष्ट केले. आजच्या घडीला सोलर उद्योगासाठी आपल्याकडे खऱ्या अर्थाने हे मेड इन इंडिया उत्पादन आहे.

English Summary: Did the farmers hear! Free electricity for twenty years now Published on: 16 September 2020, 06:59 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters