श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती व धेनू ॲप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दि. १४, १५ व १६ सप्टेंबर दरम्यान तीन दिवसीय ऑनलाईन डिजिटल उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयातील शेवटच्या वर्षातील विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच शिक्षक तिन्ही दिवस मोठया संख्येने सहभागी झाले होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देशच असा होता की, ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाबरोबरच डिजिटल उद्योजकता समजावी व आपल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करून घरबसल्या आपल्या मोबाईलद्वारे डिजिटली उद्योग, व्यवसाय करता यावा, या उद्देशाने धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि या कंपनीने सुशिक्षित बेरोजगार, तरुणांना तसेच शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्याचे डिजी मार्ट मॉडेल विकसित केले आहे.
ग्रामीण भागातील पशुपालकांना डिजिटली दर्जेदार वस्तू व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे डिजी मार्ट मॉडेल अधिक फायदेशीर ठरले आहे. या डिजी मार्टच्या माध्यमातून कित्येक ग्रामीण भागातील तरुण युवकांना तसेच विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्याचे संकेत आहेत.
या डिजिटल उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक तथा प्रशिक्षण अधिकारी श्री. हरीश फरकाडे सर यांच्या हस्ते पार पडले तसेच डिजिटल उद्यमिता या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान, यशस्वी उधोजकतेची सूत्रे, धेनू डिजीमार्ट- डिजिटल उद्योजकतेमधील संधी, डिजिटल मार्केटिंग व करियर संधी.
सोशल मीडिया प्रोमोशनची गरज व महत्व, डिजिटल बिजनेस स्ट्रॅटेजी, रोजगार निर्मितीचे धेनू डिजि मार्ट मॉडेल यासारख्या विविध विषयावर श्री. श्रीनाथ नलगोटले, श्री. संतोष खवळे, श्री.अकिफ खान, श्री. दिनेश म्हस्कर तसेच धेनू कंपनीचे डिजिटल बिजनेस मॅनेजर श्री. नितीन पिसाळ इत्यादी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.
डिजिटल उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान विविध विषयावर आधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये अती उत्कृष्टरित्या सहभाग नोंदवलेल्या पाच विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये किंमतीचा मार्ट प्लॅन, ट्रॉफी तसेच सहभाग प्रमाणपत्र हे बक्षीस कार्यक्रमादरम्यान लवकरच वितरित केले जाणार आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ. समृद्धी काळे यांनी केले. तसेच हा कार्यक्रम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धेनूची सर्व टीम तसेच श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशांक देशमुख सर तसेच इतर प्राध्यापक वृंद व प्रशिक्षण अधिकारी प्रा. हरीश फरकाडे सरांचे विशेष सहकार्य लाभले.
Published on: 18 September 2023, 11:28 IST