News

कोरोना काळात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज हस्ती शेती करताना बघायला मिळाले होते, आता याच यादीत धर्मेंद्र पाजीचे देखील नाव समाविष्ट झाले आहे. धर्मेंद्र नेहमीच आपल्या कार्यामुळे सोशल मीडियामध्ये चर्चेत राहतात. धर्मेंद्र पाजीने बॉलीवूडमध्ये आपल्या कामगिरीमुळे एक वेगळे स्थान कमविले आहे, अजूनही धर्मेंद्र बॉलीवूड मध्ये मोठे सक्रिय आहेत. ते आपल्या प्रोफेशनल लाईफ मध्ये तसेच आपल्या पर्सनल लाईफ मध्ये मोठे ॲक्टिव असल्याचे बघायला मिळत आहे.

Updated on 23 February, 2022 7:34 PM IST

कोरोना काळात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज हस्ती शेती करताना बघायला मिळाले होते, आता याच यादीत धर्मेंद्र पाजीचे देखील नाव समाविष्ट झाले आहे. धर्मेंद्र नेहमीच आपल्या कार्यामुळे सोशल मीडियामध्ये चर्चेत राहतात. धर्मेंद्र पाजीने  बॉलीवूडमध्ये आपल्या कामगिरीमुळे एक वेगळे स्थान कमविले आहे, अजूनही धर्मेंद्र बॉलीवूड मध्ये मोठे सक्रिय आहेत. ते आपल्या प्रोफेशनल लाईफ मध्ये तसेच आपल्या पर्सनल लाईफ मध्ये मोठे ॲक्टिव असल्याचे बघायला मिळत आहे.

त्यांच्याजवळ असलेल्या कौशल्यामुळे एके काळी संपूर्ण सिनेसृष्टीत राज करणारे धर्मेंद्र सध्या शेती क्षेत्रात चांगलेच ऍक्टिव्ह असल्याचे बघायला मिळत आहे. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे एकेकाळी सुपरस्टार या उपाधीने सन्मानित झालेले धर्मेंदर यावेळी एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत धर्मेंद्र पाजी सध्या शेती क्षेत्रात सक्रिय असल्यामुळे सोशल मीडियावर याविषयी चांगलीच चर्चा रंगली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचे सुपरस्टार धर्मेंदर यांनी एक व्हिडिओ शेअर करत आपल्या शेतीमध्ये कोण कोणती पिके लावली आहे त्याबाबत खुलासा केला होता. धर्मेंद्र पाजी ने ट्विटरवर ट्विट करत एक व्हिडिओ शेअर केला आणि त्यात त्यांच्या चाहत्यांना सांगितले की त्यांनी शेतात कांदा लावला आहे आणि आता बटाटे लावण्याच्या तयारीत आहेत त्यांच्या या ट्विटमुळे सर्वत्र धर्मेंद्र पाजीच्या या कार्याचे मोठे कौतुक केले जात आहे. त्यांचे चाहते त्यांचे शेतीचे कसब बघून अवाक झाल्याचे बघायला मिळाले.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी शेताच्या काठावर उभा असलेला एक व्हिडिओ पाजी यांनी ट्विट केला आहे. धर्मेंद्र यांनी शेतीमधील हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की- 'मित्रांनो... कसे आहात?  कांदे लावले आहेत…आणि आता मी बटाटे लावणार आहे. व्हिडिओमध्ये धर्मेंद्र शेतात काम करणाऱ्या आपल्या मजुरांना विशेष प्रोत्साहन देताना दिसत होते. ते म्हणतात, 'शाब्बास... चांगलं काम कर, जगत राहा.  असेच चालते'. धर्मेंद्र यांच्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी त्याचे मोठे तोंड भरून कौतुक केले आणि त्याला प्रेरणास्थान म्हणुन संबोधित केले. बॉलिवूडचे दिग्गज धर्मेंद्र अनेकदा आपल्या शेतातील पिक्चरस आणि व्हिडिओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर करतात. धर्मेंद्र कधी शेतात ट्रॅक्टर चालवताना तर कधी आपल्या मजुरांना प्रोत्साहन देताना व्हिडिओ शेअर करत असतात. 

त्यांच्या या व्हिडिओजमुळे त्यांच्या चाहत्यांनी त्यांना मोठे प्रेम दाखवले तसेच त्यांच्या या कार्याचे तोंडभरून कौतुक केले. त्यांच्या चाहत्याव्यतिरिक्त अनेक दिग्गजांनी देखील त्यांच्या कार्याचे मोठे कौतुक केले आहे. धर्मेंद्र पाजी यांचे हे कार्य भारत एक कृषिप्रधान देश असल्याचा वैश्विक पटलावर दुजोरा देत आहे. कृषिप्रधान भारत देशाची एक झलक धर्मेंद्र पाजी यांनी आपल्या ट्विटर वर शेअर केली असल्याच्या प्रतिक्रिया देखील ट्विटर वर बघायला मिळत आहेत.

English Summary: dharmendra are in farm dharmendra cultivating onion and potato
Published on: 23 February 2022, 07:28 IST