News

मनोज राठोड आणि नामदेव वाघमारे या दोन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबापैकी एका शेतकऱ्याच्या पोटी चार मुली आहेत. या चारही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली आहे.

Updated on 01 September, 2023 11:37 AM IST

पुणे

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे शुक्रवारी (दि.१८) रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना एका भावनिक क्षणाला सामोरे जावे लागले आहे. मुंडे दौऱ्यावर असताना एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाने कृषिमंत्र्यांची भेट घेतली. यवतमाळ जिल्ह्यातील मनोज राठोड आणि नामदेव वाघमारे या दोन शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. हे कुटुंबीय धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी यवतमाळमध्ये आले होते. यावेळी धनंजय मुंडे यांच्याकडे आपली व्यथा मांडत असताना त्या महिला भगिनींला रडू कोसळले.

मनोज राठोड आणि नामदेव वाघमारे या दोन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबापैकी एका शेतकऱ्याच्या पोटी चार मुली आहेत. या चारही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली आहे.

शेतकरी नवरा तर गेला आता चार मुलींचा सांभाळ कसा करणार, असा प्रश्न विचारत ती भगिनी धाय मोकलून रडू लागली. त्यात शासनाची मिळणारी मदतही अद्याप मिळाली नसल्याचे तिने धनंजय मुंडे यांना सांगितले.

दरम्यान, कृषिमंत्र्यांनी या अनुभवानंतर एक ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणाले की, आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नाहीत. कुटुंबापुढील प्रश्न आणखी वाढतात. आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा विचार करून कुठल्याही शेतकरी बांधवाने आत्महत्या करण्याचा विचार मनात आणू नये. कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास किंवा शेतकरी बांधवांना कोणतीही मदत लागल्यास आपल्या घराचे दरवाजे २४ तास उघडे आहेत.

English Summary: Dhananjay Munde will pay for the education of 'those' four girls
Published on: 19 August 2023, 06:12 IST