कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी एक पोस्ट करून म्हटले आहे की, काल मी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आत्महत्याग्रस्त शेतकरी मनोज राठोड यांच्या कुटुंबातील एक महिला भगिनी मला भेटायला आल्या.
त्यांना शासनाकडून मिळणारी मदत तातडीने मिळेल, याची व्यवस्था केली आहे. पण त्यांना चार मुली आहेत, त्या चारही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी मी घेतली आहे. यामुळे त्यांचे शिक्षण पूर्ण होणार आहे.
सांगायचा उद्देश हा आहे की, आत्महत्या केल्याने फक्त जीवन संपते, प्रश्न सुटत नाहीत उलट ते वाढतात! माझ्या शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती आहे की असा विचार मनातसुद्धा आणू नका.
अखेर शेतकऱ्यांना मिळणार कांद्याचे अनुदान, मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली महत्वाची माहिती..
तुमच्या कोणत्याही अडचणीत मदतीसाठी माझी दारं 24 तास उघडी आहेत. असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना धीर नेण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार का.? हे लवकरच समजेल.
देशात गेल्या 10 दिवसांपासून मान्सून ठप्प, पावसाची परिस्थिती चिंताजनक..
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याला अनेक कारणे आहेत. मात्र यानंतर त्यांची कुटूंबे उघड्यावर पडली आहेत. सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
कर्तृत्वाचा सन्मान! महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना प्रदान
कर्तृत्वाचा सन्मान! महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना प्रदान
मशरूमची लागवड कशी केली जाते, शेतकऱ्यांना लाखोंचा नफा मिळेल, जाणून घ्या..
Published on: 21 August 2023, 09:59 IST