News

राज्यभरातील आज सकाळपासून बत्ती गुल झाली होती. महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला होता. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला होता. असे असतानाआता संप मागे घेण्याबाबत तोडगा निघाला असल्याची माहिती समोर येत आहे.

Updated on 04 January, 2023 5:22 PM IST

राज्यभरातील आज सकाळपासून बत्ती गुल झाली होती. महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला होता. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला होता. असे असतानाआता संप मागे घेण्याबाबत तोडगा निघाला असल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबत थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार असल्याचे देखील समोर येत आहे.दरम्यान, संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार होती. सरकारच्या इशाऱ्यानंतरही संपकरी कर्मचारी ठाम होते. भंडारा जिल्ह्यातील सुमारे 10 हजार वीज ग्राहकांना वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका बसला आहे. सकाळपासून जिल्ह्यातील अनेक फिडर बंद आहेत.

कुठे 11 केव्ही, तर कुठे 33 केव्ही फिडर बंद आहेत. त्यामुळे सुमारे 10 हजार घरागुती आणि कृषी वीज ग्राहकांची वीज बंद आहे. वीज बंदचा फटका बसल्याने छोटे मोठे व्यावसायिक तथा गृहिणींना नसल्याचे चित्र जिल्ह्यात बघायला मिळत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महावितरण कर्मचारी यांच्या बैठकीत यशस्वी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. 

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात, छातीला लागला मार

दरम्यान, आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती. हा संप मागे घेण्यासाठी त्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली. फडणवीस म्हणाले की, महावितरणचे खासगीकरण करायचे नाही. त्याबद्दल कोणताही विचार नाही असंही फडणवीस म्हणाले आहेत.

भाजीपाल्याचे दर पडले, शेतकरी आर्थिक अडचणीत

आज वीज कर्मचारी आणि उपमुख्यमंत्री-उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली, या बैठकीत वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला आहे. यामुळे काल रात्रीपासून पसरलेल्या अफवा आता बंद होणार आहेत. यामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या;
कर्नाटकमध्ये ऊस उत्पादकांना FRP पेक्षा 100 रुपये अधिक, महाराष्ट्र का नाही? आता राजू शेट्टी आक्रमक..
या गावात ३०० वर्षांपूर्वीची परंपरा, मातीची घरे आणि चुलीवरचा स्वयंपाक, संपूर्ण गावात एकच फोन..
कर्जत- जामखेडमध्ये रोहित पवार की राम शिंदे? कार्यकर्त्यांने लावली 1 लाखाची पैज, चेकही केला जमा

English Summary: Devendra Fadnavis's successful mediation strike Mahavidran employees
Published on: 04 January 2023, 05:22 IST