राज्यात सध्या राजकीय नाट्य सुरु आहे. यामुळे कधी काय घडामोड घडेल हे सांगत येत नाही. सत्ता येत असते जात असते, तसेच सत्ता गेली की मंत्र्यांचे अधिकार आणि शासकीय सुविधा देखील जात असतात. मंत्र्यांना मिळणारे सरकारी घर देखील त्यांना सत्ता गेली की सोडावे लागते. असे असताना महाराष्ट्राचे विरोध पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना देवगिरी (Devgiri Bungalow) सोडायचे नाही. यामुळे याकडे लक्ष लागले आहे.
अजित पवार यांनी सामान्य प्रशासन विभागाला देवगिरी बंगला आपल्याकडे राहावा, या मागणीचे पत्र दिले आहे. तसेच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचे देखील सांगितले जात आहे. मात्र राष्ट्रवादीकडून हे वृत्त नाकारण्यात आले आहे. गेली अडीच वर्ष उपमुख्यमंत्री पदावर काम करत असताना अजित पवार यांना देवगिरी बंगला मिळाला होता. तर आता मात्र अजित पवार यांना देवगिरी आपलासा वाटायला लागला आहे.
दरम्यान, सामान्य प्रशासन विभाग मंत्र्यांना बंगले वाटपाचे काम करत असते. अजित पवार 1999 ला काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आले तेव्हापासून देवगिरी बंगल्यावर राहायला गेले. 1999 ते 2014 अजित पवार देवगिरी बंगल्यावरच राहत होते. यामुळे आता त्यांना हे घर सोडू वाटत नाही. २०१४ नंतर सुधीर मुनगंटीवार यांना हे घर देण्यात आले होते. तेव्हा भाजपचे सरकार होते.
आता एकाच झाडावर टोमॅटो, वांगी, बटाटे, शास्त्रज्ञांनी केली शेतीमध्ये क्रांती
असे असताना पुन्हा एकदा 2019 ला पुन्हा एकदा सत्तांतर झाले आणि अजित पवार देवगिरी बंगल्यावर राहायला गेले. देवेंद्र फडणवीस 2019 साली विरोधी पक्षनेता झाल्यानंतर त्यांना सागर बंगला देण्यात आला. फडणवीस यांनी सागर बंगल्याची (Sagar Bungalow) मागणी केली. महाविकासआघाडी सरकारनेही त्यांची मागणी पूर्ण केली होती.
दिवसाला 20 ते 30 लिटर दूध देणाऱ्या म्हशी, शेतकऱ्यांनो कष्टाचा घ्या मोबदला, वाचा सविस्तर..
यामुळे आता अजित पवारांनी देवगिरी बंगल्यातच राहण्याचा आग्रह केला आहे, त्यामुळे फडणवीस मागची परतफेड करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे सबंध बघता त्यांना तोच बंगला मिळेल. अशी शक्यता आहे. यामुळे आता नक्की काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
आता काही दिवस पावसाची विश्रांती! 'या' तारखेला पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार, पंजाबरावांनी व्यक्त केला अंदाज...
ब्रेकिंग! रानिल विक्रमसिंघे होणार श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती
आता मोदींच्या २ हजारासाठी चुकीची माहिती दिली असेल तर होणार शिक्षा, जाणून घ्या..
Published on: 21 July 2022, 11:42 IST