News

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महावितरण आणि शेतकरी यांच्यात वाद सुरू आहे. शेतकऱ्यांची वीज तोडली जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. वीज बील न भरल्याने अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची वसुली सुरु आहे.

Updated on 22 November, 2022 9:16 AM IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महावितरण आणि शेतकरी यांच्यात वाद सुरू आहे. शेतकऱ्यांची वीज तोडली जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. वीज बील न भरल्याने अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची वसुली सुरु आहे.

महावितरणकडून बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. यामुळे मात्र जे नियमित वीजबिल भरतात, त्यांना मात्र याचा फटका बसतो. यामुळे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

या शेतकऱ्यांना देखील सूट देण्याचा आदेश उपमुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) दिले आहेत. फडणवीस म्हणाले, ज्यांना नुकसान झाले नाही, त्यांनी वीज बील भरा. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांची वसुली नंतर करता येईल.

गेट्स फाउंडेशन आफ्रिकेत सुमारे 7 अब्ज गुंतवणूक करणार

जे शेतकरी नियमित वीज बील भरत आहेत, तसेच ज्यांनी चालू महिन्याचे शेतपंपाचे बील भरले आहे, अशा शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत न करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बील भरलेल्या शेतकऱ्यांची वीज कापल्याच्या तक्रारी फडणवीस यांच्याकडे आल्या होत्या. यामुळे त्यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. पाऊस चांगला पडल्याने शेतकऱ्यांचे आता पिकांचे नियोजन सुरू आहे. मात्र वीज तोडल्याने शेतकऱ्यांना पाणी देता येत नाही.

आता चक्का जाम! उस दरासाठी राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

त्यामुळे पिके सुकून जात आहेत. आधीच अतिवृष्टीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना वीज तोडणी मोहिमेमुळे दुहेरी फटका बसत आहे. लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 18 हजार पंपांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या;
आम्हाला तुमची वीज नको आणि आमच्या शेतात तुमचा खांब नको! शेतकऱ्यांनी महावितरणला आणले जाग्यावर..
मदर डेअरीने वाढवले दुधाचे दर
धरणे अजून शंभर टक्के! शेतकऱ्यांची रब्बीची चिंता मिटली..

English Summary: Devendra Fadnavis regarding farmers paying regular electricity bills
Published on: 22 November 2022, 09:16 IST