राहुरी कृषी विद्यापीठाच्या कृषी विद्या विभागा द्वारे जवळजवळ 46 एकर क्षेत्रावर एकात्मिक सेंद्रिय शेतीचे मॉडेल विकसित करण्यात आले आहे. या रोल मॉडेलच्या साह्याने शेतकऱ्यांना वार्षिक कमीत कमी पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते, याबद्दलचे मार्गदर्शन येथील शास्त्रज्ञ करीत आहे.
यासाठी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, विद्यमान कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील, तसेच संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे इत्यादी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विद्यापीठाच्या शेती संशोधन प्रकल्पाच्या विविध विभागाच्या टीम द्वारे पडीक जमिनीवर किंवा पारंपारिक लागवड सुरू असलेल्या जमिनीवर एकर क्षेत्रावर सेंद्रिय शेती संशोधन सुरू आहे.
नेमके काय आहे हे रोल मॉडेल
या 46 एकर क्षेत्रावर सेंद्रिय शेती संशोधन अंतर्गत घेण्यात येणाऱ्या पिकांवर विद्यापीठाची जिवाणू खते, जैविक कीटकनाशके वापरली जातात. तसं काही क्षेत्रावर बिजो उत्पादनासाठी उन्हाळी सोयाबीन, जाम जेली साठी पेरू, पल्प साठी शिताफळ तसेच उसाच्या विविध प्रकारच्या चार वाणांची लागवड केली आहे. उरलेल्या काही क्षेत्रावर भाजीपाला लागवड करण्यात आली आहे यामध्ये मिरची कांदा, कोथिंबीर, मेथी तसेच अजून काही वेगवेगळ्या भाजीपाल्यांचे लागवड केली आहे. तसेच पशुपालन मध्ये देशी गाई, शेळ्या आणि कोंबड्यांचे ही पालन सुरु करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे गट करून त्यांना विविध सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे डॉ. उल्हास सुर्वे यांनी सांगितले.
जवळ जवळ तिसऱ्या वर्षी विद्यापीठाच्या या सेंद्रिय शेती प्रकल्प च्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या प्रक्षेत्रावरील पिकांच्या विक्रीद्वारे विद्यापीठाच्या महसूल उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे गेल्या दोन वर्षापासून शासनाच्या कुठल्याही प्रकारचे आर्थिक मदत न घेता या प्रकल्पाने स्वयंपूर्णतेकडे चांगली वाटचाल सुरू केली आहे. बीज उत्पादना द्वारे फिरता निधी 18 लाखांचा तसेच विविध पिकांच्या पिकांवरील चाचण्यांद्वारे बत्तीस लाखांचे उत्पन्न असे एकूण पन्नास लाखांचे निव्वळ उत्पन्न असे एकूण 50 लाखांचे निव्वळ उत्पन्न या प्रकल्पाने मिळवले आहे.
Published on: 17 May 2021, 11:41 IST