News

मुंबई: राज्यात 48 लोकसभा मतदारसंघात 4 टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम निवडणूक आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे.

Updated on 14 March, 2019 9:09 AM IST


मुंबई:
राज्यात 48 लोकसभा मतदारसंघात 4 टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम निवडणूक आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यासाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक 18 मार्च 2019 आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा दिनांक 25 मार्च 2019 आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी 26 मार्च 2019 तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 28 मार्च 2019 आहे. पहिल्या टप्प्यासाठी मतदान 11 एप्रिल 2019 रोजी होईल.

  • पहिल्या टप्प्यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या 7 मतदारसंघात मतदान होणार आहे. 

दुसऱ्या टप्प्यासाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक 19 मार्च 2019 आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा दिनांक 26 मार्च 2019 आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी 27 मार्च 2019 तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 29 मार्च 2019 आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान 18 एप्रिल 2019 रोजी होईल.

  • दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या 10 मतदारसंघात मतदान होणार आहे. 

तिसऱ्या टप्प्यासाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक 28 मार्च 2019 आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा दिनांक 4 एप्रिल 2019 आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी 5 एप्रिल 2019 तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 8 2019 एप्रिल आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान 23 एप्रिल 2019 रोजी होईल.

  • तिसऱ्या टप्प्यात जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या 14 मतदार संघात मतदान होणार आहे.

चौथ्या टप्प्यासाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक 2 एप्रिल 2019 आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा दिनांक 9 एप्रिल 2019 आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी 10 एप्रिल 2019 तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 12 एप्रिल 2019 आहे. चौथ्या टप्प्यासाठी मतदान 29 एप्रिल 2019 रोजी होईल. 

  • चौथ्या टप्प्यात नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरुर आणि शिर्डी या 17 मतदारसंघात मतदान होणार आहे. 
सर्व चारही टप्प्यांमधील मतदानाची मतमोजणी हि 23 मे 2019 रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक हा 27 मे 2019 आहे.

English Summary: Detailed about 48 Constituency Election Programme in the State
Published on: 14 March 2019, 08:35 IST