जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात चिंचखेडा बुद्रुक या गावात मंगेश जयवंत पाटील नावाचे शेतकरी राहतात. मंगेश पाटील या शेतकऱ्याने तिथे दुष्काळी परिस्थिती असूनही त्यांच्या १२ एकर जमीन क्षेत्रात करवंदाची लागवड केलेली आहे आणि त्यामधून मंगेश पाटील लाखो रुपयांची कमाई करत आहेत.मंगेश पाटील यांनी जे त्यांच्या शेतात जे करवंद लावले आहेत त्या करवंद ला फक्त जळगाव मधेच मागणी नाहीतर तर याव्यतिरिक्त या करवंद ला कोलकाता तसेच दिल्ली च्या बाजारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
शेतकरी नेहमी संकटात असतात:
अगदी त्यांच्या परिसरात दुष्काळी वातावरण असून सुद्धा सर्व प्रकारची व्यवस्था तसेच योग्य नियोजन करून करवंदाची बाग लावून त्यातून ते लाखो रुपये कमवत आहेत. जळगाव जिल्ह्यात मंगेश जयवंत पाटील हे असे एकमेव शेतकरी आहेत जे त्यांच्या १२ एकर क्षेत्रावर करवंदाची लागवड करत आहेत. मंगेश पाटील यांच्या १२ एकर क्षेत्रात तेथील आसपासच्या परिसरातील जवळपास २०० मजूर काम करत आहेत. जळगाव जिल्ह्यात पावसाळा कमी प्रमाणात असल्यामुळे तिथे नेहमी दुष्काळ परिस्थिती असते त्यामुळे तिथे रब्बी तसेच खरीप पिकातून सुद्धा उत्पन्न भेटत नाही त्यामुळे तेथील शेतकरी नेहमी संकटात असतात.आणि अशा वेळी मंगेश पाटील या शेतकऱ्याने त्यांच्या १२ एकर शेतामध्ये करवंद पिकाची लागवड करून त्यामधून त्यांनी लाखो रुपये चे उत्पन्न काढले आहे.
हेही वाचा:कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांसाठी राज्य सरकारचे मिशन वात्सल्य मोहीम
त्यामुळे तेथील परिसरातील शेतकरी वर्गासमोर त्यांनी एक आपला आदर्श निर्माण केला आहे जे की तेथील शेतकऱ्यांना एक नवीन उमेद जागवून दिलेली आहे. मंगेश पाटील या शेतकऱ्यांने मुलाखतीत सांगितले आहे की त्या परिसरातील इतर शेतकरी वर्गाने सुद्धा आपल्या शेतीमध्ये करवंद ची लागवड केली पाहिजे. मंगेश पाटील यांनी त्यांच्या १२ एकर क्षेत्रात जवळपास ८ हजार करवंद च्या वृक्षांची लागवड केली होती.
करवंद या पिकावर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होत नाही त्यामुळे आपण अगदी द्राक्ष सारखे पीक घेऊ शकतो त्यामुळे या मधून आपल्याला चांगले उत्पन्न सुद्धा भेटते त्यामुळे मंगेश पाटील या यशस्वी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याने तेथील शेतकऱ्यानी आपला कल या शेतीकडे वाढवावा असे आव्हान केले आहे. जे की तेथील काही प्रमाणात शेतकरी वर्ग मंगेश पाटील यांच्या शेतीत कशा प्रकारे लागवड केली आहे याची माहिती घेण्यासाठी सुद्धा येत आहेत
Published on: 30 August 2021, 07:08 IST