२०२१ या चालू वर्षी सतत चालू असणारा पाऊस आणि गुलाबी बोंड अळी मुळे शेतकऱ्यांनी घेतलेल्या कापसाच्या पिकाचे खूप मोठे नुकसान झाले.त्यामुळे कृषी विभागाने यावर्षी शेतकरी कापसाला प्राधान्य न देता दुसरे पीक घेतील असा अंदाज लावलेला होता पण तसे न काही होता यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी कापसाला च चांगली पसंद दिली आहे, खामगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी २७ हजार ५५६ हेक्टर कापसाची लागवड केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी कापसाचे पीक घेतले होते पण त्यावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तेथील शेतकऱ्यांच्या कापसाचे २०% एवढे नुकसान झाले होते.पण काही दिवसात सतत जोरदार पाऊस पडल्याने कापसाची बोंडे सडली त्या बोंडाची वाढच झाली नसल्याने आधीच २० टक्के नुकसान झाले होते पण पावसामुळे कापसाचे ४०% नुकसान झाले.त्यामुळे शेतकर्यांमध्ये चलबिचल वातावरण तयार झाले होते, याच्या तुलनेत सोयाबीन तसेच दुसऱ्या पिकांचे शेतकऱ्यांना चांगले उत्पादन भेटले होते.
हेही वाचा;बोगस बियाणांमुळे शेतकरी अडचणीत, उत्कृष्ट दर्जाच्या कंपनीचे बियाणे उपलब्ध करण्याची मागणी
कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे कृषी विभागाने असा अंदाज लावला होता की यावर्षी कापसाची पेरणी कमी होईल. जसे की त्यांचे नियोजन असे जाते की तालुक्यात बागायती कापूस ७ हजार तर जिरायती कापूस १८ हजार असे सर्व मिळून २५ हजार हेक्टर पेरणी होईल असा अंदाज लावला होता पण याउलट आत्ता पर्यंत तालुक्यात कापसाची ६० टक्के पेरणी होऊन आत्तापर्यंत २७ हजार ५५६ हेक्टरवर कापसाची पेरणी झाली आहे आणि अजूनही यापुढे पेरणी होईल असे सांगण्यात आले आहे.
एका एकरात जर कापूस लावायचा असेल तर आपल्याला फक्त १ हजार रुपयांचे बियाणे लागते तर सोयाबीन चे ३५०० रुपयांचे बियाणे लागते तसेच यावर्षी सोयाबीन चे बियाणे बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांनी कापसालाच पसंदी दिली आहे. तालुक्यात भौगोलिक क्षेत्र जर पाहायला गेले तर ११८५३४ हेक्टर असून पेरणीसाठी ८४३७१ हेक्टर योग्य आहे त्यामध्ये ४९९५४ हेक्टर पेरणी झाली असून त्यामध्ये सर्वात जास्त कापसाचे पिक घेतले गेले आहे.
Published on: 29 June 2021, 11:45 IST