पावसाने यावेळी फक्त खरीप हंगामातील पिकांचे नुकसान केले नाही तर त्याच बरोबर फळबागा, भाजीपाला चे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालले आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आपल्या शेतात नवीन नवीन प्रयोग केले मात्र निसर्गाची अवकृपा आणि बाजारात सातत्याने ढासळत असलेले भाव त्यामुळे शेतकरी वर्गाचे आर्थिक गणित ढासळत आहे.
पीक घेतले तर त्यामधून जास्त उत्पादन निघत नाही:
मागील काही दिवसांपूर्वी उस्मानाबाद, नाशिक या जिल्ह्यातील भाजीपालाचे दर समोर आले तर अत्ता बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात. यावेळी पाऊसाने जोरदार बरसून सिमला मिरचीचे एवढ्या मोठ्या प्रमाणात केले की जवळपास २५ टन मिरची बांधावर टाकून देण्याची परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवली.पारंपरिक पद्धतीने शेतात पीक घेतले तर त्यामधून जास्त उत्पादन निघत नाही त्यामुळे आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील अरुण दादासाहेब पाडोळे या शेतकऱ्याने आपल्या एक एकर शेतात सिमला मिरची ची लागवड केली होती जे की त्यांनी यासाठी १६ हजार रुपये खर्च करून सिमला मिरचीची रोपे आणली होती. रोपे आणल्यानंतर सर्व व्यवस्थित चालले होते जे की रोपांची लागवड केल्यानंतर पाऊस सुद्धा वेळेवर आला आणि उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढेल अशी आशा आपल्या मनात ठेवली.
हेही वाचा:जागतिक बाजारपेठेत केशरचा भाव आसमानी थेटला, व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात फायदा
ज्यावेळी सिमला मिरची काढणी ला आली त्याचवेळी पाऊसाने आपले आगमन केले आणि ज्याप्रकारे खरीप हंगामातील पिकांची दुर्दशा होते तसेच शिमला मिरचीची अवस्था झाली. पाऊस आणि ढगाळ वातावरण झाल्यामुळे मिरचीवर किडीचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि नुकसान झाले.जेव्हा लागवड केली तेव्हापासून कीटकनाशक फवारणी तसेच मशागतील दीड लाख रुपये खर्च आला आणि बाजारभाव काय सुरू आहे त्याची सुद्धा वारंवार चौकशी करत होते मात्र पाऊसाने थैमान घालून पीक हिरावून घेतले.
काढणीअभावी सडली मिरची:
सलग १५ दिवस पाऊस सुरू असल्याने मिरचीच्या फडात पाणी साचले त्यामुळे मिरची काढता आली नाही. हिरव्या मिरच्या झाडाला जरी वाळल्या तरी सुद्धा पाऊसाने उघडीप दिली नाही त्यामुळे मिरच्या बांधावर टाकून देण्याची परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढली.
हजारो रुपयांचे नुकसान:
लागवड केल्यापासून काढणी पर्यंत जवळपास ४० ते ५० हजार रुपये खर्च आला.बाजारात फक्त मिरचीला ६ रुपये प्रति किलो असा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी मिरचीची काढणी करण्यापेक्षा त्यावर नांगर फिरवणे पसंद केले.
सिमला मिरचीला 4 रुपयाचा भाव:
येवला तालुक्यातील बाजारपेठेत वाढत असलेली भाजीपाला ची आवक आणि पावसाच्या परिनामामुळे शेतकरी खूप संताप व्यक्त करत आहेत. येवला तालुक्यातील बाजारपेठेत फक्त ४ रुपये प्रति किलो असा सिमला मिरचीला भाव मिळाला आहे.
Published on: 23 September 2021, 06:23 IST