News

गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाने केलेली कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण अशी म्हणावे लागेल. गेल्या दोन वर्षांमध्ये शासनाने उद्योग धंदा मधील गुंतवणूक, शेती,पायाभूत सुविधा, पर्यटन, वने, सर्वसामान्यांना घरे, रोजगार अशा प्रत्येक विभागांनी नवनवीन योजना राज्यात राबविल्या हे सांगताना मला आनंद होत आहे.

Updated on 26 January, 2022 2:01 PM IST

गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाने केलेली कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण अशी म्हणावे लागेल. गेल्या दोन वर्षांमध्ये शासनाने उद्योग धंदा मधील गुंतवणूक, शेती,पायाभूत सुविधा, पर्यटन, वने, सर्वसामान्यांना घरे,  रोजगार अशा प्रत्येक विभागांनी नवनवीन योजना राज्यात राबविल्या हे सांगताना मला आनंद होत आहे.

राज्य शासनाने घेतलेला शेतकऱ्यांचा कर्जमुक्तकरण्याचा अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतला असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.राज्यपाल कोषारी हे 26 जानेवारी या भारतीय प्रजासत्ताकाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात भाषण करताना बोलत होते.

 शेतकर्‍यांना मोठा दिलासा

 शेतकरी वर्गाला आपल्या पायावर उभे करणे तसेच त्यांना आर्थिक दृष्ट्यास्वावलंबी आणि सक्षम करणे हे आमचे धोरण आहे.

त्याचाच एक भाग म्हणून माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तनअर्थात  स्मार्ट प्रकल्प राबवला जात आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये शेतकऱ्यांना सक्षम बनविणे तसेच शेतमालासाठी सर्वसमावेशक मूल्य साखळी विकसित करणे त्यासोबतच विकेलतेपिकेलया संकल्पनेच्या माध्यमातूनशेतकऱ्यांना अधिक बळ देणे सुरू आहे.. आज राज्यात पाच हजार शेतकरी गट तसेच कंपन्यांना थेट खरेदीदारांशी जोडण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःला समर्थ आणि सक्षम करावे यासाठी ई पीक पाहणी मोबाईल ऍप्लिकेशन तयार करण्यात आले आहे.त्या माध्यमातून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अखेर सुमारे 96 लाख शेतकऱ्यांनी हे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करून या योजनेचा लाभ घेतला आहे.

तसेच शासनाने अक्षय ऊर्जा म्हणजेच नवीकरणीय ऊर्जा चे धोरण आणून महाराष्ट्राने ऊर्जा क्षेत्रात क्रांती आणली आहे. छतावरील सौर ऊर्जा पासून ते कृषी पंपा पर्यंत किंवा पडीक जमिनीवर सुद्धा ही ऊर्जा  क्रांती करणार आहे. शेतकऱ्यांना फायदेशीर आणि किफायतशीर तसेच दिवसा शुभेच्छुक वीज पुरवठा होण्यासाठी कृषी पंप विज जोडणी याचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करणे सुरू आहे.

English Summary: desison of debt forgiveness is revolutionary says bhagatsing koshyari
Published on: 26 January 2022, 02:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)