News

सध्या रक्तचंदन लागवडीतून पैशांचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना चुना लावणारी तामिळनाडूतील एक टोळी सक्रिय झाली आहे.नाशिक जिल्ह्यातील देवळा, चांदवड तसेच मालेगाव तालुक्यातील तब्बल 41 शेतकऱ्यांना या टोळीने जवळजवळ 40 लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Updated on 23 February, 2022 4:11 PM IST

सध्या रक्तचंदन लागवडीतून पैशांचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना चुना लावणारी तामिळनाडूतील एक टोळी सक्रिय झाली आहे.नाशिक जिल्ह्यातील देवळा, चांदवड तसेच मालेगाव तालुक्यातील तब्बल 41 शेतकऱ्यांना या टोळीने जवळजवळ 40 लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील गिरणारे गाव चे विनोद कौतिक खैरनार यांनी या बाबतीत आपले चार लाख वीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली असून या बाबतीतला पहिला गुन्हा देवळा पोलिसांमध्ये दाखल झाला आहे. तसेच यामध्ये फसवणूक झालेल्या इतर काही शेतकऱ्यांनी देखील देवळा पोलिस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दिले आहेत. या प्रकरणांमध्ये नाशिक जिल्ह्यातील एकटा देवळा तालुक्यात अंदाजे तीस लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

 तामिळनाडूतील श्री. लक्ष्मी गणपती नर्सरी कंपनीच्या नावाने सात ते आठ  जणांच्या टोळीने नाशिक जिल्ह्यातील देवळा, मालेगाव आणि चांदवड तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांना रक्तचंदन लागवडीचे आमिष दाखवून रक्त चंदनाचे झाड लावण्यासाठी प्रति झाड तुम्ही दोनशे रुपये भरा त्याबद्दल तुम्हाला दोन हजार रुपये अनुदान देण्यात येईल. तसेच ही सरकारी योजना आहे व सरकारी अधिकारी येऊन तुम्हालाहेअनुदानाचे वाटप करतील असे या तथाकथित कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. तसेच शेतकऱ्यांमध्ये याबाबतीत विश्वास निर्माण व्हावा यासाठी काही शेतकऱ्यांना त्यांनी रक्त चंदनाची रोपे देखील आणून दिली. तसेच शेतकऱ्यांना सांगितले की जर तुम्ही जास्त रोपे घेतली तर तुम्हाला बोरवेल तसेच तारेचे कुंपण देखील करून देऊ आणि रक्त चंदनाचे झाडाची येणारे उत्पन्न खरेदी करण्याची देखील हमी दिली. 

त्यामुळे शेतकऱ्यांचा यावर विश्वास बसला व शेतकऱ्यांनी रक्तचंदनाचा झाडांसाठी लाखो रुपयांची गुंतवणूक केली.. यानंतर शेतकऱ्यांनी या कंपनीच्या संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न आल्याने शेतकऱ्यांना फसवणूक झाल्याचे कळले व शेतकऱ्यांनी  पोलिसात धाव घेऊन तक्रार अर्ज दाखल केले आहेत.

English Summary: deseceive to farmer to give plant or sandelwood and subsidy in nashik district
Published on: 23 February 2022, 04:11 IST