News

जर आपण गेल्या दोन वर्षांचा विचार केला तर डॉलरच्या तुलनेत मध्ये रुपया पार घसरत असून सध्या रुपया आता डॉलरच्या तुलनेत 80 च्या जवळपास आला आहे.यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसू शकतो.

Updated on 16 July, 2022 9:10 PM IST

जर आपण गेल्या दोन वर्षांचा विचार केला तर डॉलरच्या तुलनेत मध्ये रुपया पार घसरत असून सध्या रुपया आता डॉलरच्या तुलनेत 80 च्या जवळपास आला आहे.यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसू शकतो.

यामुळे नेमके आयात महाग होईल व त्याचा फटका थेट नागरिकांना बसणार आहे. रुपयाची प्रत ढासळल्यामुळे कच्च्या तेलाची आयात, आयात करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, परदेशी शिक्षण आणि विदेशी प्रवास देखील महाग होणार आहे.

नक्की वाचा:देशात महागाई वाढणार! 18 जुलैपासून खिश्यात जास्तीचे पैसे ठेवा...

 पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये काय होईल परिणाम?

 रुपयाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर अवमूल्यन झाल्याने सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड प्रमाणात कमी झालेल्या इंधनाच्या किमतीचा फायदा भारताला घेता येणार नाही.

त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधन यासारख्या इंधनांच्या गरजा भागवण्यासाठी भारतात 85 टक्के परदेशी तेलावर अवलंबून आहे.

रुपयाचे डॉलरच्या तुलनेत घसरणीचा परिणाम हा  तेल आयातीवर सरळ होतो. त्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता जवळजवळ मावळते.

नक्की वाचा:शेतकऱ्यांना कोट्यावधील गंडा घालणारा अटकेत! उकीरड्यात पुरुन ठेवलेले लाखो रुपये..

 आयात का वाढते?

 जर ताज्या आकडेवारीनुसार विचार केला तर देशाची आयात जून मध्ये तब्बल 57.55 टक्क्यांनी वाढून 66.31 अब्ज डॉलर पर्यंत वाढली आहे.

त्या तुलनेत निर्यात 23.52 टक्क्यांनी वाढून केवळ 40.13 अब्ज डॉलर वर पोहोचली आहे. ही व्यापारी तूट 2021 च्या तुलनेत 26.18 अब्ज इतकी वाढली आहे. ही वाढ तब्बल 172.72 टक्क्यांनी आहे. परिस्थिती भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठा धोका असल्याचे मानले जात आहे.

नक्की वाचा:महत्वाचे: -पीक पाहणी नोंदीविना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेता येईल,याबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रसिद्ध

English Summary: depreciation of indian currancy compare to doller in last two year
Published on: 16 July 2022, 09:10 IST