सिंदखेडराजा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या शेतबांधावर जावून कृषी विभागाकडून खरीप हंगामाचे मार्गदर्शन व सोयाबीन उगवण क्षमतेचे प्रात्यक्षिक सादर करण्याची काम तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सेवक, कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी करत आहे.
तालुक्यातील आडगांव राजा परिसरात शेतकऱ्यांना शेतामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी जाताना त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र आडगांव राजा येथे जवळपास १०० ते १५० नागरिकांची गर्दी दिसली.त्यांनी नागरीकांना विचारणा केली असता.कोविडच्या लसीकरण करण्यासाठी आलो असल्याचे समजले. लसीकरणासाठी वेळ असल्यामुळे नागरीक बसले होते. हीच बाब तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी सोबत असलेल्या कृषी सहाय्यक यांनी नागरिकांना सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन केले. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांनी नागरीकांना मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की, सद्या उन्हाळी मशागती कामाला वेग आला असून शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीला लागला आहे.
मागील दोन वर्षापासून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागल्याने मोठे नुकसान सहन करावे लागले यातून कसेबसे सावध बळीराजा जोमाने खरिपाच्या तयारीला लागला कृषी विभागाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांना बियाणे या बाबत जनजागृती तुन माहिती देण्यात येत आहे.
गोवोगावी जावून कृषि विभागाकडून सोयाबीन उगवण क्षमतेची प्रात्यक्षिके दाखविले जात असुन यामध्ये ७० टक्क्यापेक्षा जास्त उगवण क्षमता असेल तरच त्या बियाणांचा वापर पेरणीसाठी करावा असे तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले.चालू वर्षी २०२१-२२ खरीप हंगामामध्ये सोयाबीन ३४ हजार हेक्टर ,तूर ४ हजार ७०० हेक्टर ,उडीद १ हजार ५५० हेक्टर ,मुंग १ हजार २५० हेक्टर , कापूस २२ हजार ३०७ हेक्टर , ज्वारी ५५ हेक्टर , बाजरी १२ हेक्टर , मका १५० हेक्टर वर लागवडीचे उद्दिष्टे ठेवण्यात आली आहे.
यावर्षी सोयाबीन पिकाचे वाढणारे क्षेत्र लक्षात घेता शेतकऱ्यांनी घरच्याच बिलाचा वापर जास्तीत जास्त करावा यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे तालुका कृषी अधिकारी व कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन उगवणक्षमता कशी तपासावी याची प्रात्यक्षिके दाखवत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमधून या मोहिमेचे स्वागत केले जात
Published on: 07 May 2021, 09:31 IST