सोयाबिन हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक असून सोयाबीनची लागवड महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रातील विदर्भ तसेच मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात सोयाबीन लागवड मोठ्या प्रमाणात होते.
परंतु यावर्षी महाबीजने सोयाबीन बियाण्याच्या किमतीमध्ये दोन हजारांनी वाढ केल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिएकर 2 हजार रुपये अनुदान देण्याची मागणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.अनिल बोंडे यांनी केली.
भाजप प्रदेश कार्यालयात मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. बोंडेबोलत होते.त्यावेळी त्यांनी सांगितले की, गेल्यावर्षी सोयाबीन बियाण्याची तीस किलो ची बॅग 2200 रुपयेला होती परंतु यावर्षी महाबीज ने 30 किलो ची बॅगची किंमत चार हजार दोनशे पन्नास रुपये केली.
या सगळ्या परिस्थितीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असून आता खाजगी सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांनी देखील दरवाढ केली आहे. त्यामुळे आधीच अनेक संकटाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना दुपटीने झालेली ही वाढ सहन होण्यासारखे नसल्याने राज्य शासनाने सोयाबीन उत्पादक यांच्या बँक खात्यात प्रति एकर दोन हजार रुपये अनुदान जमा करावे, असे ते म्हणाले.
सोयाबीनच्या एका बॅगमागे पाचशे ते हजार रुपये तर कपाशी बियाण्याच्या बॅगमागे 43 रुपयांची वाढ
बियाण्यांच्या दरवाढीमुळे शेतीच्या खर्चात वाढ होणार आहे.
बाजारात सर्टिफाइड आणि ट्रुथफूल अशा दोन प्रकारची बियाने उपलब्ध आहेत. तसेच विद्यापीठांनी संशोधन केलेले वानांचा देखील यामध्ये समावेश असतो. जर सोयाबीन बियाण्याचा मागच्या वर्षाचा विचार केला तर ते तीन हजार सहाशे ते चार हजार रुपयांपर्यंत होते.
परंतु यावर्षी यामध्ये वाढ करण्यात येऊन आता ते दर 4000 ते 5000 रुपयांपर्यंत पोचण्याची माहिती आहे. तसेच कापूस बियाण्यांचा पॉकेट च्या दरात देखील वाढ करण्यात येऊन प्रति पाकीट मागे 43 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. एका मध्ये 475 ग्रॅम बियाणे असते. यामध्ये नॉन बीटी बियाणे 25 ग्रॅम असते. मागच्या वर्षी 767 रुपयाला मिळणारे पॉकेट यावर्षी 810 रुपयाला मिळेल.
यामुळे आधीच महागाईने त्रस्त असल्याने शेतकऱ्यांना बियाण्यात वाढलेल्या दरामुळे आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:यावर्षीही शेती परवडणार की नाही? बियाणांच्या दरात मोठी वाढ, सोयाबीन बॅग मागे 1 हजाराची वाढ
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो पशुपालन करायचं असेल तर 'या' प्रदर्शनाला नक्की भेट द्या; ठरेल फायद्याचे
Published on: 28 May 2022, 09:40 IST