News

नगर:- भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन अहमदनगर शहरासाठी मोठ्या निधीची मागणी केली आहे. अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतर खासदार विखे यांनी अहमदनगर शहरातील रस्त्यांचा प्रश्न हाती घेतला आहे. त्यांनी अहमदनगर शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडे २५ कोटी रुपयांची मागणी केली.

Updated on 07 December, 2022 9:34 AM IST

नगर:- भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन अहमदनगर शहरासाठी मोठ्या निधीची मागणी केली आहे. अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतर खासदार विखे यांनी अहमदनगर शहरातील रस्त्यांचा प्रश्न हाती घेतला आहे. त्यांनी अहमदनगर शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडे २५ कोटी रुपयांची मागणी केली.

यावेळी महसूलमंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित होते. खासदार डॉ. सुजय 'विखे पाटील यांनी अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचे काम मार्गी लावले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले. उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतर नगरकरांनी अहमदनगर शहरातील रस्त्यांकडे लक्ष वेधले होते. समाज माध्यमांवर तसे मीम्स देखील व्हायरल झाले होते.

यावर खासदार विखे पाटील यांनी त्यांच्या शैलीत काम करत अहमदनगर शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. रस्त्यांच्या विकासासाठी त्यांनी २५ कोटी रुपयांची मागणी केली आहे.

याशिवाय सावेडी बसस्थानकाच्या सुशोभिकरणासाठी पाच कोटी रुपयांची देखील मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. या मागणीवर लवकरच कार्यवाही करू, असे आश्वासन त्यांनी खासदार विखे पाटील यांना दिली आहे.

अहमदनगर शहराचा विस्तार होत आहे. त्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर केल्याबद्दल खासदार विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

English Summary: Demand of Vikhe Patals of 25 crores for road works from Chief Minister
Published on: 07 December 2022, 09:34 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)