News

गेवराई पैधा गावचे सरपंच मंगेश साबळे यांनी गळ्यात दोन लाख रुपयांच्या नोटांची माळ घालून पंचायत समिती बीडीओचा निषेध केला. याचा विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विहीर मंजूर करण्यासाठी बीडीओ अधिकाऱ्याने शेतकऱ्यांना पैसे मागितल्यामुळे संतप्त सरपंचाने पंचायत समिती कार्यालयासमोर हे कृत्य केलं आहे.

Updated on 31 March, 2023 4:06 PM IST

गेवराई पैधा गावचे सरपंच मंगेश साबळे यांनी गळ्यात दोन लाख रुपयांच्या नोटांची माळ घालून पंचायत समिती बीडीओचा निषेध केला. याचा विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विहीर मंजूर करण्यासाठी बीडीओ अधिकाऱ्याने शेतकऱ्यांना पैसे मागितल्यामुळे संतप्त सरपंचाने पंचायत समिती कार्यालयासमोर हे कृत्य केलं आहे.

याबाबत सरपंच म्हणाले, मी अपक्ष सरपंच झालो आहे. मी निवडणुकीत पैसे वाटले नाहीत, विहीर मंजूरीसाठी शेतकऱ्यांना कुठल्या तोंडांनी पैसे मागू. तुम्ही जर एखाद्या सभापतीचं, एखाद्या आमदाराचं ऐकून फक्त पैशावाल्यांच्या विहिरी करणार असाल तर मायबापाहो गरिबांचं काम कोण करणार? गरिबाला कोण वाली आहे?" असा प्रश्न साबळे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, विहिरी मंजूरीसाठी अधिकारी शेतकऱ्यांना पैसे मागत आहेत, अशी तक्रार शेतकऱ्यांनी सरपंच साबळे यांच्याकडे केली होती. याच घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.राज्य सरकारच्या विहीर अनुदान योजने अंतर्गत गेवराई पैधा गावाचे शेतकऱ्यांनी पंचायत समिती बीडीओकडे विहीर मंजूरीसाठी अर्ज केला होता.

16 लाख फुलांच्या सुगंधाने भरलेले आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन

असे असताना बीडीओने विहीर मंजूरीसाठी पैशाची मागणी केल्याचा आरोप सरपंच साबळे यांनी केला. त्यामुळे सरपंचाने २ लाख रक्कमेच्या नोटांची माळ त्यांनी गळ्यात अडकून बिडिओच्या गैरकृत्याचा पाढा वाचत नोटांची उधळण केली. यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे.

शेतकऱ्यांनो कलिंगड, खरबुज लागवड आणि व्यवस्थापन

यावेळी साबळे यांनी बिडिओने विहीर मंजूरीसाठी पैसे मागितल्याचा आरोप केला. "दहा-दहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांकडून जमा करून दोन लाख रुपये मी घेऊन आलो आहे. या पंचायत समितीच्या बिडिओला आम्ही हे पैसे देतोय, असे त्यांनी म्हटले आहे.

कांदा अनुदानासाठी 'या' तारखेपर्यंत मुदत, असा करा अर्ज..
काय सांगता! आता उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी, जाणून घ्या..
कांदा अनुदान मिळण्यास पीक नोंदणीचा अडसर, शेतकरी नाराज

English Summary: Demand money from farmers for well approval; The sarpanch shouted while throwing the notes.
Published on: 31 March 2023, 04:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)