कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मागील आठवड्यात येवला एपीएमसी व त्या अंतर्गत येणार्या अंदरसुल उपबाजार समितीत लाल कांद्याला मोठी मागणी बघायला मिळाली. त्यामुळेच एपीएमसीच्या मुख्य आवारात तसेच उपबाजार समितीच्या आवारात कांद्याची मोठी आवक असताना देखील कांद्याचे बाजार भाव समाधानकारक असल्याचे सांगितले गेले. उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ या राज्यात कांद्याला मोठी मागणी असल्याने, येवला एपीएमसी व उप बाजारातून मोठ्या प्रमाणात कांदा या राज्यात पाठवला जात आहे.
देशांतर्गत या राज्यात तसेच परदेशात कांद्याला मोठी मागणी असल्याने कांद्याचे बाजारभाव टिकून असल्याचे सूत्राद्वारे सांगितले गेले. मागच्या आठवड्यात येवल्याच्या बाजारपेठेत एक हजार क्विंटल कांद्याची आवक झाली, एवढी दमदार आवक असतानादेखील कांद्याला सरासरी 2550 रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजार भाव प्राप्त झाला. कांद्याला मिळत असलेला समाधान कारक बाजार भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सिद्ध होताना दिसत आहे.
येवल्याच्या मुख्य बाजार समितीत 61 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली तर उपबाजारात 25 हजार क्विंटल कांद्याची आवक नमूद करण्यात आली. उपबाजारात देखील कांद्याला 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर प्राप्त झाला. मागील महिन्यात लाल कांद्याची पावणेतीन लाख क्विंटल आवक नमूद करण्यात आली होती, त्यावेळी कांद्याला सरासरी एक हजार 1900 रुपये प्रति क्विंटल एवढा दर प्राप्त झाला, त्यामुळे या महिन्यात विशेषता गतसप्ताहात कांद्याच्या बाजार भावात थोडी वाढ नमूद करण्यात आली. जाणकार लोकांच्या मते, देशांतर्गत तसेच परदेशांत कांद्याची मागणी वाढल्याने कांद्याच्या बाजारभावात सुधारणा बघायला मिळत आहे. मागील महिन्यापेक्षा कांद्याच्या आवक मध्ये घटक घडून आली आहे तसेच कांद्याला मागणी वाढल्याने कांद्याच्या दरात तेजी असल्याचे सांगितले जात आहे.
या खरीप हंगामात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची लागवड केली गेली, मात्र असे असले तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील लाल कांदा उत्पादनात मोठी घट झाली आहे. म्हणून सध्या बाजारपेठेत कांदा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत असली तरी कांद्याला कमी वजन असल्याने कांदा हा बाजारपेठेत कमी वजन देत असल्याचे सांगितले जात आहे. बाजारपेठेतील चित्र बघता मार्च महिन्यापर्यंत लाल कांद्याची आवक कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे तसेच यादरम्यान कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळणार अशी आशा तज्ञांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात उन्हाळी कांदा लागवड संपुष्टात येते मात्र यावेळी वातावरणात प्रतिकूल बदल झाल्याने कांदा लागवड खोळंबली आहे आणि जिल्ह्यात अजूनही अनेक ठिकाणी उन्हाळी कांद्याची लागवड बघायला मिळत आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पाऊस झाला असल्याने मुबलक पाण्याचा साठा उपलब्ध आहे तसेच उन्हाळी कांद्याचे रोपवाटिका देखील मोठ्या प्रमाणात असल्याने कांदा लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. उन्हाळी हंगामात आगात म्हणजे सुरुवातीला लावलेला कांदा मार्च महिन्यात काढणीसाठी येणार आहे. असे असले तरी उन्हाळी हंगामातही निसर्गाचा लहरीपणा कायम असल्याने कांद्याच्या उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Published on: 16 February 2022, 12:01 IST